सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात 620 कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज एकूण तीन हजार 135 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 434 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 620 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 392 पुरुष व 228 महिलांचा समावेश आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे आज कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी दररोजचा मृत्यूचा आकडा 10 ते 15 च्यादरम्यान होता. 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 19 हजार 925 जण कोरोनाबाधित झाले आहेत तर आतापर्यंत 550 जणांचा बळी घेतला आहे. रुग्णालयात अद्यापही सहा हजार 770 उपचार घेत असून 12 हजार 598 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 
आज गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील 50 वर्षाचे पुरुष, मलिकपेठ (ता. मोहोळ) येथील 75 वर्षांचे पुरुष, केम (ता. करमाळा) येथील 52 वर्षांचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 75 वर्षाचे पुरुष, रोहिदास चौक पंढरपूर येथील 75 वर्षांचे पुरुष, अक्कलकोट येथील पण 58 वर्षाचे पुरुष, लिंक रोड पंढरपूर येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेक-अप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT