सोलापूर

पंढरपुरात अज्ञाताचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोेधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : शहरातील एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. या घटनेची माहिती घरातील लोकांना समजली नाही. ती मुलगी गरोदर राहिली आणि त्यातून शनिवारी तीचे सोलापूर येथे सिझरीन करावे लागले. त्या मुलीस मुलगा झाला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोेधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार (Child sexual abuse) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A girl from Pandharpur was tortured by an unknown person)

या घटनेची पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या कडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर येथील एका बारा ते तेरा वर्षाच्या मुलीला काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागला. मुलीचे वडील परगावी असतात. त्यामुळे मुलीच्या आईने स्थानिक डाॅक्टरांकडे तपासणी केली. तेंव्हा मुलगी गर्भवती असल्याचे डाॅक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित मुलीच्या आईला मुलीला तातडीने सोलापूर येथे पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. मुलीची आई, जवळच राहणारे मामा यांनी मुलीला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डाॅक्टरांनी तपासणी केली. मुलीची परिस्थिती पाहून सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलीने सुमारे दिड किलो वजनाच्या बाळास जन्म दिला आहे. दोघेही सध्या सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संबंधित मुलीशी अजून पोलिसांचे बोलणे झालेले नाही आणि त्या अल्पवयीन मुलीवर कोणी अत्याचार केले, या विषयी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक श्री.जगदाळे पुढील तपास करीत आहेत. (A girl from Pandharpur was tortured by an unknown person)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT