सोलापूर

अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या वाहनांना दणका

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील मांगी तलाव परिसरात वडगाव (उत्तर)जवळ अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्‍टर व एक पिकअप वाहनांवर कारवाई करण्यात आली. 
करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी करमाळा तालुक्‍यातील अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीची बातमी "सकाळ'मध्ये 28 मे रोजी प्रसिद्ध होताच महसूल विभागाने वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाईचा धडका सुरू केला आहे. मांगी तलाव परिसरातून अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार समीर माने यांच्या पथकाने हा अचानक छापा टाकून कारवाई केली. 
सदर कारवाईत अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरपैकी चार ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी तीन विना नंबरचे असून एकाचा क्रमांक एमएच 45/एस 2190 आहे. उर्वरित तीन ट्रॅक्‍टर व एक पिकअप हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. संबंधित पळून गेलेल्या वाहनचालक बिरू नामदेव शिंदे, सचिन अशोक काळे, परशुराम अशोक शिंदे व एक अज्ञात यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर कारवाईत तीन ब्रास वाळू व अंदाजे 32 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
सदर कारवाई तहसीलदार समीर माने यांच्यासह पथकातील संतोष गोसावी, तलाठी विनोद जवणे, राजेंद्र राऊत, हनुमंत ढवळे, सतीश बिजले, साईनाथ आडगटाळे, अजय चव्हाण यांनी केली. तसेच बुधवारी बिटरगाव (वां.) येथे अनधिकृत वाहतूक करताना पकडलेल्या ट्रॅक्‍टरवर एक लाख 36 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. बिटरगाव (वां.) येथील कारवाई ही महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे, तलाठी उमेश बनसोडे, आनंदा डोणे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT