ST Bus Amritmahotsav In solapur
ST Bus Amritmahotsav In solapur Sakal
सोलापूर

सोलापूरात ‘लालपरी’चा अमृतमहोत्सव उत्साहात

विजय थोरात

सोलापूर - एसटी महामंडळाने आज ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. एसटी महामंडळातर्फे यंदा सोलापूर विभागातील सर्व एसटी आगार आणि एसटी बस स्थानकांची सजावट करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूर विभागातील सोलापूर आगारातही अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभियंता (चालन) विवेक लोंढे तर अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी होते. कार्यक्रमांची सुरूवात दिपप्रज्वलन आणि बसचे पूजन करून तसेच केक कापून करण्यात आली. अन्य कर्मचाऱ्यांनी सोलापूर बस स्थानकावर प्रवाशांचे गुलाबपुष्प आणि पेढे देऊन स्वागत केले. सोलापूर आगार आणि बस स्थानकावर रांगोळी घालून प्रवाशांचे आजच्या दिवशी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. या बससोबत प्रवास सुरू झाला आणि १ जून २०२२ रोजी एसटी महामंडळाने ७५ व्या वर्षात पदार्पण केले. एसटीच्या ताफ्यात आता वेगवेगळ्या रंगरुपाच्या बस आहेत. पण पहिली लाल रंगाची एसटी बस आजही राज्यातील नागरिकांच्या आठवणींमध्ये कायम आहे. या बसमुळेच एसटीच्या गाड्यांना ‘लालपरी’ म्हणायला सुरुवात झाली.

एसटीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला जोडले. यामुळे प्रवास करणे सोपे झाले. आजही एसटीचा प्रवास सुखकर प्रवास मानला जातो. कार्यक्रमास विभागीय कार्यालयातील विभागीय अभियंता विरसंघ स्वामी, उपयंत्र अभियंता उत्तम जुंदळे, विभागीय लेखा अधिकारी उदय देशपांडे, विभागीय वाहतूक अधिकारी परशुराम नकाते, उपस्थित होते. प्रास्ताविक सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे यांनी केले व आभार कामगार अधिकारी प्रदीप सुतार यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT