logo
logo 
सोलापूर

बॅडमिंटन, जलतरण खेळास परवानगी, जिल्हाधिकारी शंभरकर यांचा आदेश 

प्रमोद बोडके

सोलापूर : बंदीस्त जागेतील (इनडोअर गेम्स) जलतरण, बॅडमिंटन, स्क्वॅश, नेमबाजी इत्यादी खेळांना आजपासून परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. 

प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जांच्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी वापरता येतील. याबाबतच्या मानक कार्यपद्धती (स्टॅडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून देण्यात येतील. योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना नियमित कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मानक कार्यपद्धतीचा अवलंब करणे अपेक्षित आहे. 

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशा व्यक्ती ,संस्था, संघटना विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT