Parab.nandgaonkar
Parab.nandgaonkar 
सोलापूर

"कोण काय करतं हे मला चागलं माहीत आहे, केबलवाल्यांना जाऊन विचारा !' नांदगावकरांचा परबांवर हल्लाबोल 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का? माझा आणि परब यांचा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहीत आहे, पाहिजे तर केबलवाल्यांना जाऊन विचारा, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केली. 

लॉकडाउन दरम्यान आलेल्या वाढीव वीजबिलांच्या विरोधात मनसेतर्फे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का, असा प्रश्न विचारत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेला सुपारी घेऊन काम करणारा पक्ष आहे, अशी टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना बाळा नांदगावकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. 

वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी मनसेवर हल्लाबोल केला होता. तसेच या वेळी बोलताना अनिल परब यांनी भाजपवर वीजबिल होळी आंदोलनवरूनही टीका केली होती. महाविकास आघाडीचं सरकार जाईल हे पाहात भाजपला पाच वर्षे काढायची आहेत. त्यानंतरही त्यांचं स्वप्न भंग होणार आहे. सत्तेविना ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्ते बिथरू नयेत म्हणून त्यांना असं बोलावं लागतं, असं म्हणत अनिल परब यांनी भाजपचाही समाचार घेतला होता. 

श्री. नांदगावकर पुढे म्हणाले, आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का? माझा आणि परब यांचा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहीत आहे, पाहिजे तर केबलवाल्यांना जाऊन विचारा!' अशी टीका बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केली. 

ते पुढे म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, याचा अधिकार पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. सध्या "एकला चलो रे' अशीच आमची भूमिका असल्याचं मत श्री. नांदगावकर यांनी व्यक्त केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT