मोहोळ (सोलापूर) : दिल्ली येथे शेतीविषयक मागण्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा दर्शवत आज (मंगळवार) संपूर्ण भारत बंदमध्ये दुकाने बंद न करता नैतिकतेने बळिराजाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याची भूमिका चेंबर ऑफ कॉमर्सच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता म्हणून शेतकरी संघटनांनी मंगळवारी त्या संदर्भात मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये तालुक्याचे आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या प्रमुख नेते व "चेंबर'च्या पदाधिकाऱ्यांसह बैठक झाली. या बैठकीमध्ये यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे मोहोळ शहर यापुढे बंद न ठेवता निवेदन, निषेध आदीच्या मार्गाने सर्वसंमतीने पाठिंबा द्यावा, अशा प्रकारे ठरलेल्या बैठकीतील निर्णयाची आठवण करून देत, शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा देण्यासंदर्भात निवेदन देऊन, आपली दुकाने उघडावीत, असे सर्व सहमतीने ठरविण्यात आले. त्याप्रमाणे मंगळवारी (ता. 8) नेहमीप्रमाणे छोट्या - मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने व आस्थापने रोजच्याप्रमाणे उघडली आहेत.
बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी व्यापारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधत चेंबरचे अध्यक्ष नाना डोके, मार्गदर्शक अनिल कोरे, भैय्या आंडगे, रामेश्वर नरखेडकर, पद्माकर देशमुख, बबलू शेख, गणेश केवळे, राजशेखर घोंगडे, अप्पा वाघमोडे, सुजित काळे, सुनील गोटे, समाधान जाधव, नागेश बंडगर, हेमंत फाटे, आकाश फाटे, सचिन कवठे, सचिन देशमाने, नागेश पुराणिक, भैय्या भिवरे, स्वप्नील मोळे, सुनील शेटे, मुन्ना बागवान, गणेश लवटे, विक्रम आदलिंगे, विद्यानंद गुमते आदी व्यापारी प्रयत्नशील आहेत.
बंद काळात कुठेही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पोलिस निरीक्षक अशोक सायकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.