maratha morcha
maratha morcha 
सोलापूर

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची मराठा आंदोलकांवर पुष्पवृष्टी 

प्रमोद बोडके

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज विविध मराठा संघटनांच्यावतीने सोलापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांच्यावतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. 

आज सकाळी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. "एक मराठा, लाख मराठा', "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', यासह "जय भवानी, जय शिवाजी' घोषणा देत मराठा आंदोलनातील मोर्चेकरी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराकडे निघाले. भगव्या टोप्या, भगवे गमजे व हातात भगवे ध्वज घेऊन आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. 

सोलापुरातील काळजापूर मारुती जवळील आमदार देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजाने तीव्र आंदोलन केले. या आंदोलनानंतर भाजप आमदार विजयकुमार देशमुख, त्यांचे चिरंजीव व नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी मोर्चेकरांच्या भावना जाणून घेतल्या. आमदार देशमुख यांच्या घराजवळ मोर्चा येताच आमदार देशमुखांच्यावतीने तीन ते चार ठिकाणी मराठा आंदोलकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी महापौर मनोहर सपाटे, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाच्यावतीने या वेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलिसांनी या परिसरात चोख बंदोबस्त लावला होता. मोर्चेकऱ्यांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी या परिसरातील वाहतूक वळविण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT