Politics
Politics 
सोलापूर

राजकारणात खळबळ ! भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर व अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदेंची गुप्त भेट

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर वावरणारे अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदे आणि भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची आज कल्याणराव काळे यांच्यासमवेत गुप्त बैठक झाली. या भेटीनंतर पंढरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक नेते तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर व बाळा भेगडे यांनीही भाजपच्या विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

मागील दोन दिवसांपासून अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी झाले होते. तसेच जयंत पाटील आणि कल्याणराव काळे यांची गुप्त बैठक घेण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा असतानाच, आमदार संजय शिंदे यांनाच आता गळाला लावण्याची तयारी सुरू केली आहे. 

याच दरम्यान आज भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार संजय शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाली. विशेष म्हणजे, ही बैठक कल्याणराव काळे यांच्या उपस्थितीत झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

पंढरपूरची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तर भाजपचे जिल्हा प्रभारी माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनीही स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह वाढला आहे. 

दरम्यान, या गुप्त बैठकीचा तपशील समजू शकला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT