Coron Teacharer.jpg
Coron Teacharer.jpg 
सोलापूर

भावांसाठी बहिणींनी रोखला कोरोना  आरोग्यसेविका, शिक्षिका, पोलिसासह आशावर्करही आहेत कोरोना योद्धा 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : भाऊबीज हा भावांच्या दिर्घायुष्यासाठी बहिणींनी ओवाळण्याचा दिवस. कोरोनाच्या सहा महिण्यांच्या कालावधीत ज्या भगिणींनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनबरोबरच्या लढाईत कोरोना योद्धा म्हणुन सहभाग घेतला त्यांच्या कार्याला आज भाऊबीजेनिमित्त हा उजाळा. कोरोनच्या लढाईत डॉक्‍टर, आरोग्यसेविका, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पोलिसांसह आशा स्वयंसेविका यांनी जीवावर उदार होऊन कष्ट केले. या मोहिमेत अनेकजण सहभागी असले तरी प्रतिनिधीक स्वरुपात प्रत्येक क्षेत्रातील महिला आपले अनुभव "सकाळ'च्या कॉफी विथ सकाळ या उपक्रमात मांडत आहेत. 

दीड वर्षाच्या मुलाला घेऊन केली सेवा 

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथील परिचारिका अंजली रातमाले - पेंढारकर यांनी सांगितले की, 
वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाच्या या संकटात मला समाजासाठी प्रत्यक्ष योगदान देता आले, याचे समाधान आहे. या कालावधीतील सेवेसाठी आम्हाला वाढीव आणि वेगळा मोबदला मिळालेला नाही. माझ्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन मी कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा केली हा कालावधी माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील, असाच आहे. कोरोना महामारीत समाजाला वाचविण्यासाठी योगदान देणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभारण्याची आवश्‍यकता आहे. 

दोन चिमुकली घरात असतानाही केली सेवा 

फौजदार चावडी पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी रेश्‍मा मोरे यांनी सांगितले की, घरात अर्जून आणि विघ्नेश ही दोन चिमुकली असतानाही नागरिकांच्या घरापर्यंत कोरोना पोहचणार नाही, याची दक्षता घेतली. त्यासाठी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात 23 मार्च ते 30 सप्टेंबरपर्यंत ड्यूटी केली. बाळीवेस, देशमुख- पाटील वस्ती, निराळे वस्ती, दत्त चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात ड्यूटी केली. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलिस बांधवांनी या संकट काळात जनसेवा केली. कोरोनाबाधित कुटुंबाबद्दल लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा या काळात प्रयत्न केला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, याची दक्षता घेतली. 


देशसेवा समजून 68 दिवस केली ड्युटी 

विजयपूर रोडवरील नूतन विद्यालयाच्या शिक्षिका विद्या बिराजदार यांनी सांगितले की, मला 18 ऑगस्टपासून कोरोना ड्युटी मिळाल्याचे सजल्यापासून सिंगापूर येथील माझ्या भावासह अनेकांनी सूचना केल्या. काळजी कशी घ्यावी, याबद्दल अनेकांनी सांगितले. या काळात अनेक चांगले वाईट अनुभव आले. उत्तर कसबा, मल्लिाकर्जुन मंदिर परिसरात आम्ही सर्व्हे केले. कन्नड बोलता येत असल्याने या भागात संवाद साधणे सोपे गेले. अनेक उच्चभ्रू लोक दारात उभेही करून घेत नसत अक्षरश: हकलून लावत असत. तसे काही काळजी घेण्याविषयी सूचना देत आपुलकीने चौकशी करणारेही मिळाले. शिक्षक आरोग्य खात्याच्या मदतीसाठी या माहिमेत सहभागी आहेत याचा विसर आरोग्य खात्याला पडायचा याची मात्र खंत वाटते. सुमारे 68 दिवस देशसेवा समजून मी ही ड्युटी केली. 

आशा सेविकांना तुटपुंजा मोबदला 

सोलापूरच्या आशा स्वयंसेविका सरोज फटके यांनी सांगितले की, लॉकडाउन कालावधीत कोरोना महामारी का सामना करताना प्रशासन आणि समाजाकडून वाईट अनुभव मिळाले. प्रशासनाने आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मानधन व इतर मोबदल्याचे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही. दिलेला तुटपुंजा मोबदला मिळण्यासाठी अनेक किचकट अटी लावल्या जात आहेत. कोरोना महामारीत सेवा बजावताना मी स्वतः कोरोना बाधित झाले. मी कोरोना बाधित झाल्यानंतर मला व माझ्या कुटुंबाला समाजाकडून पाठिंबा तर मिळालाच नाही, उलट समाजातील काही घटकांचा मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागला. 

राष्ट्रीय आपत्तीत काम केल्याचा आनंद 

अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा माशाळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील पहिला रुग्ण सापडला आणि दोन दिवस खूप टेन्शन व भितीदायक वातावरणत झाले. पण त्याचा शोध लागेपर्यंत अंगणवाडी सेविकांसह आरोग्य यंत्रणेतील सर्वाचीच पळापळ झाली. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी कुटुंबांचा सर्व्हे केला. त्याचा रोजचा रिपोर्ट वरीष्ठ कार्यालयाला देण्याचे काम नोडल ऑफिसर म्हणून केले. आहार वाटप घरपोच केले. कोरोनाविषयी ट्रेनिंग, मासिक प्रगती अहवाल, वार्षिक अहवाल, डीबीटी पात्र लाभार्थी हे काम केले. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात कार्य केल्याचा आनंद आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT