Gold Shopping App
Gold Shopping App sakal
सोलापूर

Gold Shopping App : मोबाईलवर सोने खरेदीसाठी दोन ॲप ; सोनेचांदी व्यापारी विशाल वर्मा यांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील सोन्या-चांदीचे व्यापारी विशाल वर्मा यांनी दर्शन गोल्ड फिजिकल व डिजिटल ॲपची निर्मिती करत प्रत्येक व्यक्तीला सोन्यात थेट गुंतवणूक करण्याची संधी कायद्याच्या चौकटीतून उपलब्ध करत घरबसल्या सोने खरेदीची सेवा मिळवून दिली आहे. विशाल वर्मा यांचा पिढीजात सोने-चांदीचा व्यवसाय आहे. एमबीएचे शिक्षण घेतलेले विशाल वर्मा यांनी मोबाईलवर ग्राहकांना सोने खरेदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल यावर काम सुरू केले. त्यांनी सुरवातीला दर्शन गोल्डस फिजिकल ॲपची निर्मिती केली. फिजिकल ॲपमध्ये ग्राहकाला केवळ एका फोन कॉलवर खरेदीची ऑर्डर व आरटीजीएसद्वारे खरेदीची रक्कम देखील जमा करता येते. बॅंकींग प्रणाली व केवायसी या सारख्या सुविधांमुळे हे व्यवहार सुरक्षित केले गेले आहेत.

त्यानंतर त्यांनी आता दर्शन गोल्ड डिजिटल ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये ग्राहकाला सोने खरेदीदार न बनता सोने गुंतवणूकदार बनता येणार आहे. ग्राहक यामध्ये अगदी एक ग्रॅमपासून ते पाहिजे तेवढे गुंतवणूक करून सोने खरेदी करू शकतो. त्याला ॲपवर खरेदी केल्यानंतर दुकानातून सोने कधीही नेऊन त्याचा उपयोग दागिन्यांसाठी करता येणार आहे. हे ॲप गुढीपाडव्यापर्यंत बाजारात दाखल होईल.

ठळक बाबी

  • - ॲपवर सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार शक्य

  • - सर्व मुहूर्तावर ॲपवर सोने खरेदी शक्य

  • - डिजिटल ॲपमध्ये युपीआयद्वारे व्यवहार

  • - बॅंक खाते ॲपशी जोडल्याने व्यवहाराची सुरक्षितता

  • - ॲपवरील नोंदणीकृत नातेवाइकांना सोन्याची भेट देणे शक्य

  • - चोवीस तास प्रत्येक क्षणाला सोने भाव निरीक्षणाची सुविधा

  • - केवायसी, बॅंक संलग्नेतेने सुरक्षिततेची जपणूक

स्टार्टअपमधून विकसित मूल्य

  • - दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याची गरज नाही

  • - सोने खरेदीतील सध्याच्या किचकट बॉण्ड योजनांना पर्याय

  • - महिलांना थेट मोबाईलवरून सुरक्षीत सोने खरेदीची संधी

  • - बचतीतून सोने खरेदी बुकिंगची सुविधा

  • - स्थानिक संबंधामुळे व्यवहाराला चालना

  • - ग्राहकाला सोने गुंतवणूकदार होण्याची संधी

  • - नातेवाइकांना सोने गिफ्ट देण्याची सुविधा

SLP24C52778

दर्शन गोल्ड फिजिकल ॲप आधी सुरू झाले आहे. त्यानंतर पाडव्यापर्यंत दर्शन गोल्ड डिजिटल ॲप बाजारात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून व्यापारी व ग्राहक या दोघांना लाभ होईल या पद्धतीने ॲप विकसित केले आहे.

- विशाल वर्मा, सोने चांदी व्यापारी, चाटी गल्ली, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT