dcm devendra fadnavis says will honored prashant paricharak
dcm devendra fadnavis says will honored prashant paricharak sakal
सोलापूर

Solapur News : प्रशांत परिचारक यांचा भविष्यात सन्मान करू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : प्रशांत परिचारकांच्या एका टेक्स्ट मेसेजवर दामाजी कारखान्याला शंभर कोटीचे अर्थसहाय्य उपलब्ध करून आमदार इतका मान प्रशांत परिचारकांना दिला. त्यांचा कामाचा भविष्यात योग्य वेळी योग्य सम्मान करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक समर्थकांची पुणे येथे बैठक घेतली त्या बैठकीत ते बोलत होते यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, गौरीशंकर बुरुकुल,युन्नुश शेख,काशीनाथ पाटील,भारत पाटील,औदुंबर वाडदेकर,

गोपाळ भगरे,राजेंद्र पाटील,रेवणसिध्द लिगाडे,दिगंबर भाकरे,शिवाजी नागणे,गौडाप्पा अशोक माळी नंदू हवनाळे,बबलू सुतार,सचिन चौगुले, माधवानंद आकळे,नामदेव जानकर कांतीलाल ताटे विठ्ठल बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

प्रशांत परिचारकावर लोकसभेच्या माढा मतदार संघाची जबाबदारी असल्यामुळे ते तुमच्या मतदारसंघात अधिक वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही या मतदारसंघातून भाजप उमेदवारांना मताधिक्य देण्याची जबाबदारी पार पाडावी,

यावेळी दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली 2009 पासून आम्ही पक्षाचे काम करत असून यापूर्वी दोन वेळा खासदार व आमदार निवडून दिला. परंतु विकासनिधी देताना कार्यकर्त्याला विश्वासात घेतले जात नाही.

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून आमच्या गटाला निधी डावलले जात असल्याचे सांगितले, प्रशांत परिचारक यांच्या आदेशानुसार आम्ही पक्षाचे काम करू मात्र आम्ही केलेल्या कामाचे श्रेय आम्हाला मिळावे, युन्नुश शेख यांनी तुमच्या आदेशानुसार आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळे तुम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला पण इथे आमचा करेक्ट कार्यक्रम आता होऊ लागला आहे.

गोपाळ भगरे यांनी मी 1995 पासून संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे मात्र आम्हाला विश्वासात न घेता आमच्याकडील पदे काढून घेतली. सहा महिने पक्षाला पदाधिकारी नव्हते त्यामुळे बुथ यंत्रणा कशी सक्षम होणार, दामाजीचे संचालक औदुंबर वाडेकर म्हणाले की 2014 व 2019 च्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना पडलेली मताचा विचार करता परिचारकांनी मदत केल्यामुळे पक्षाला पोटनिवडणुकीत जागा जिंकता आली.

तुम्ही मतदारसंघात कोट्यावधीचा निधी दिला पण आमच्या गटाला निधी दिला जात नाही, गौरीशंकर बुरुकुल म्हणाले की पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली, त्यावेळी विरोध केला आम्हाला विश्वासात न घेता पक्षाशी संबंधित नसलेल्यांच्या निवडी केल्या.

सध्या लोकसभेचा उमेदवाराने अद्याप आमच्याकडे विचारणा केली नाही उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात निरोप देखील दिला नाही.तरीही आम्ही पक्षाचे काम करण्यास तयार आहे.सचिन चौगुले यांनी आमच्या छावण्याची बिले अद्याप मिळाले नाहीत सदरची देयके देण्यासाठी लक्ष घालावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT