dudh sangh
dudh sangh 
सोलापूर

तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन दूध उत्पादकांशी संवाद, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांचा उपक्रम 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच माजी आमदार दिलीप माने यांनी दूध संघात महत्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. दूध संघाला आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावण्यास सोबतच आता दूध उत्पादकांच्या मूळ समस्या जाणून घेतल्या जात आहेत. यासाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन दिलीप माने यांनी प्रत्येक तालुक्‍याचा दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यातून ते दूध उत्पादकांशी संवाद साधत आहेत. 

चार दिवसापूर्वीच त्यांनी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यातील दूध उत्पादकांशी संवाद साधला. दूध संघाला दूध देण्यासाठी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी दूध उत्पादकांकडून जाणून घेतल्या. बैठक घेण्यापूर्वी अक्कलकोट तालुक्‍यातून जिल्हा दूध संघाला एक लिटरही दूध मिळत नव्हते. बैठक होतात या तालुक्‍यातून एक हजार लिटर दूध संघाकडे येऊ लागले आहे. या तीन तालुक्‍यांच्या बैठकीनंतर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांनी आज मंगळवेढा तालुक्‍यातील दूध उत्पादकांशी संवाद साधला. मंगळवेढ्यातील जिल्हा दूध संघाच्या दूध शीतकरण केंद्रावर जाऊन त्यांनी तेथील केंद्राचीही पाहणी केली. 

यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक बबनराव आवताडे, शिवाजी नागणे, औदुंबर वाडेकर, अनंत साळे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांच्यासह दूध संघाचे आजी-माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष माने म्हणाले, उर्वरित सर्व तालुक्‍यांचाही अशाच पद्धतीने दौरा होणार आहे. या दौऱ्याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे त्या तालुक्‍यातील संचालक, श्रेष्ठी यांना सोबत घेऊन थेट दूध उत्पादक अशी चर्चा केली जाणार आहे. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत सर्व तालुक्‍याचे दौरे पूर्ण करून दूध उत्पादकांना भेडसावणाऱ्या सामाईक समस्यांवर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. 

शेतकरी म्हणतात वेळेवर पैसे, पशुखाद्य द्या 
जिल्हा दूध संघाला दूध देण्यास आम्ही तयार आहोत. आम्हाला अकराव्या दिवशी दुधाचे पेमेंट द्या, पशुखाद्य वेळेवर द्या, इतर दूध सांघाप्रमाणे भाव वाढ करा अशा समस्या दूध उत्पादक मांडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT