ullas exam
ullas exam  sakal
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील साडेसतरा हजार आजी-आजोबांची पहिल्यांदाच ‘उल्लास’ परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी (ता. १७) महाराष्ट्रात ३६ हजार परीक्षा केंद्रावर झाली. यावेळी आजी- आजोबांनी विद्यार्थीदशेचा प्रौढ वयात अनुभव घेत परीक्षेचा आनंद लुटला. सोलापूर जिल्ह्यातील १७ हजार ५७१ जणांचा त्यात सहभाग होता.

उल्लास ॲपवरील नोंदणीपैकी ७४.०३ टक्के असाक्षर व्यक्तींनी परीक्षेला उपस्थिती लावली. मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलुगु, कन्नड, गुजराती आणि बंगाली या नऊ माध्यमातून परीक्षा पार पडली.

नव्वदीच्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात राज्यभर केंद्राचे अभियान राज्याच्या मदतीने वर्षभरापासून राज्यात सुरू आहे. आपली मुले-नातवंडे ज्या शाळेत शिकतात तिथेच परीक्षा देताना नवसाक्षरांच्या चेहऱ्यावर अत्यानंद दिसून येत होता. केंद्रावर ठिकठिकाणी नवसाक्षरांचे स्वागतही झाले.

त्यावेळी नव्वदी पार केलेले वृद्ध आजी-आजोबा अनेक केंद्रावर परीक्षा देताना दिसून आले. परीक्षेत महिलांची उपस्थिती अधिक होती. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरास साक्षरतेचे प्रमाणपत्र देण्यात येतील.

निकषानुसार गुण प्राप्त न झाल्यास अनुत्तीर्ण ऐवजी ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा गुणपत्रकावर देण्यात येईल. आवश्यक असलेल्यांची उजळणी व सराव शिक्षकांनी चालू ठेवायचा आहे. त्यांची येत्या सप्टेंबर किंवा मार्चमध्ये परीक्षा होईल.

नवसाक्षरतेचे हे अभियान २०२७ पर्यंत चालणार आहे, त्यामुळे राज्यातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आत्ताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही, त्यांनी येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येईल.

- डॉ. महेश पालकर, संचालक, शिक्षण संचालनालय (योजना)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT