Young-Inspirators-Network
Young-Inspirators-Network sakal
सोलापूर

‘यिन’चे आज जिल्हास्तरीय अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या वतीने जिल्हास्तरीय अधिवेशन बुधवारी (ता. ६) मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे होत आहे. यिनच्या नेतृत्व विकास कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यातील ५० महाविद्यालयांमधून ऑनलाइन निवडणुका घेत महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली होती. यिनच्या शॅडो कॅबिनेटमधील मंत्री, जिल्हास्तरावर संघटन मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, शहर स्तरावर महापौर, शहराध्यक्ष आदी पदांवर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. आता महाविद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांचे एकदिवसीय अधिवेशन बुधवारी होत आहे.

अधिवेशनाच्या उद्‌घाटनासाठी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता तथा सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, सीए असोसिएशनच्या माजी अध्यक्षा सीए निलाशा नोगजा यांची उपस्थिती असेल. या अधिवेशनामध्ये दिवसभर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लीडरशिप, फायनान्शियल लिटरसी, स्किल्स, योगा, उद्योजकता, स्टार्टअप आदी विषयांवर तज्‍ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये तज्ज्ञ वक्ते म्हणून आर्किटेक्ट डिझायनर चेतन शेडजाळे, प्रा. धनंजय सूर्यवंशी, सीए निलाशा नोगजा, अश्विन कमटम हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

या अधिवेशनाच्या समारोपासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासनाधिकारी अजयसिंह पवार, सिनेट सदस्य तथा वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. गुणवंत सरवदे आदी उपस्थित असतील.

‘यिन’चा ॲप डाउनलोड करा

यिनच्या पुढील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि कोल्हापूर येथे होणाऱ्या यिन समर यूथ समीटच्या नावनोंदणीसाठी सोबतच्या क्यूआर कोडद्वारे यिनचे ॲप डाउनलोड करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT