Dr. Gundewar
Dr. Gundewar 
सोलापूर

महाराष्ट्रातील पहिला बहुमान ! पंढरपूरचे डॉ. गुंडेवार यांनी पटकावले "एमसीएच रिप्रॉडक्‍टिव्ह मेडिसीन'मध्ये सुवर्णपदक 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर येथील डॉ. तेजस विवेक गुंडेवार यांनी एमसीएच रिप्रॉडक्‍टिव्ह मेडिसीन अँड सर्जरी (स्त्री व पुरुष वंध्यत्व चिकित्सक) अभ्यासक्रमात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत सुर्वणपदक मिळवले आहे. ही डिग्री मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले डॉक्‍टर ठरले आहेत. 

पंढरपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. विवेक गुंडेवार, डॉ. सुजाता गुंडेवार यांचे पुत्र डॉ. तेजस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर तेजस गुंडेवार यांनी नागपूर येथून एमबीबीएस आणि एमएस शिक्षण घेतले. "ऑल इंडिया सुपर स्पेशालिटी एनईईटी'मध्ये त्यांनी नववा क्रमांक मिळवला. 

एमसीएच रिप्रॉडक्‍टिव्ह मेडिसीन अँड सर्जरीसाठी संपूर्ण भारतातून चार सीट असतात. त्या शिक्षणासाठी त्यांना प्रवेश मिळाला. तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण करून त्यात त्यांनी पहिला क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. महाराष्ट्रात प्रथमच ही डिग्री मिळवण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेक-अप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT