Jyoti Gaikawad.jpg
Jyoti Gaikawad.jpg 
सोलापूर

स्टेशनरी कामातून झालेली ‘ती’ची सुरवात

सुस्मिता वडतिले

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हगलूर येथील शिव समर्थ महिला स्वयंसहायता समूहातील महिलांना बचत गटामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. या बचत गटाची स्थापना 2017 ला झाली. बचत गटाची सुरवात स्टेशनरी कामाने करण्यात आली. 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दशसूत्रीनुसार या बचत गटाने काम सुरू केले. गटाने शाश्‍वत उपजीविकेने सर्व महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहायचे ठरवले. शिव समर्थ महिला स्वयंसहायता समूहाला 2018 ला खेळते भांडवल मिळाले व त्यातून सर्व महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करण्यास सुरवात केली. यानंतर शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, मिरची कांडप, स्टेशनरी असे अनेक व्यवसाय गटातील महिला करत आहेत. बचत गटाने अनेक प्रदर्शनात यश संपादन केले. तसेच सोलापूर येथे रुक्‍मिणी जत्रेत विक्री प्रदर्शनातून पॅकेज आणि लेबरलीग कसे करायचे हे सांगण्यात आले. या प्रदर्शनात शिव समर्थ महिला स्वयंसहायता समूहाला यश मिळाले. तसेच त्यानंतर पुण्यातील स्वारगेट ते डेक्कन प्रदर्शनातही या बचत गटाने सहभाग घेतला होता. या गटाने सोलापूर कृषी प्रदर्शनात सहभाग मिळवला होता. सध्या सोलापूर व तुळजापूर या ठिकाणी शिव समर्थ महिला स्वयंसहायता समूहाने तयार केलेल्या वस्तू पोच केल्या जात आहेत. त्यामुळे समूहातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

व्यवसायासह मार्गदर्शन
आमच्या बचत गटातील महिलांचे विविध व्यवसाय जोमात सुरू आहेत. यामुळे महिला सक्षम बनल्या आहे. किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे, एचबी तपासणी शिबिरे असे अनेक कार्यक्रम गट घेतो. बचतीच्या मार्गातून आमच्या समूहाला चांगले मार्गदर्शन मिळत आहे. 
- ज्योती गायकवाड, सदस्य, शिवसमर्थ महिला स्वयंसहायता समूह, हगलूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT