solapur univercity
solapur univercity sakal
सोलापूर

अभियांत्रिकी प्रथम-द्वितीय वर्षाची परीक्षा ६ ते २३ मार्चपर्यंत; रद्द झालेले पेपर ९ ते ११ मार्चला होणार

तात्या लांडगे

सोलापूर : प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची सत्र परीक्षा सर्वात शेवटी म्हणजेच ६ ते २३ मार्च या काळात घेण्याचे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले आहे. त्यांच्यासोबत द्वितीय वर्षाची देखील सत्र परीक्षा होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा २३ जानेवारीपासून सुरु झाली. पण,२ फेब्रुवारीपासून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि २ ते ४ फेब्रुवारीचे पेपर होऊ शकले नाहीत. विद्यापीठाला ऐनवेळी त्या दिवशीचे पेपर रद्द करावे लागले.

तरीपण, महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर परीक्षेची जबाबदारी सोपवून विद्यापीठाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने परीक्षा पुन्हा सुरु केली. मात्र, त्या तीन दिवसांचे रद्द झालेले पेपर आता घ्यायचे कधी, हा प्रश्न विद्यापीठासमोर आहे. दुसरीकडे पेपर झाल्यापासून साधारणतः: ३० दिवसांत निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. आता तर विद्यापीठाने यंदापासून ऑनस्क्रिन मूल्यमापनाची पद्धत सर्वच अभ्यासक्रमासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दिवसांतच निकाल जाहीर होतील, असा विश्वास विद्यापीठाने सुरवातीला व्यक्त केला होता.

मात्र, महिना होऊनही अजून कोणत्याही शाखेचे निकाल लागलेले नाहीत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे २ ते ४ फेब्रुवारीला रद्द झालेले पेपर हेच आहे. आता रद्द झालेली परीक्षा संपल्याशिवाय निकाल जाहीर करणे कठीणच मानले जात आहे. तरीपण, मार्चअखेर बहुतेक अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून जूनपासून नवे सत्र सुरु होईल, असे विद्यापीठाकडून नियोजन करण्यात आले आहे.

रद्द झालेले पेपर ९ ते ११ मार्च रोजी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे २ ते ४ या तीन दिवसांत विद्यापीठाला परीक्षा रद्द करावी लागली होती. ती परीक्षा आता ९ ते ११ मार्च या काळात घेण्याचे नियोजन असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. परंतु, एकाच दिवशी दोन पेपर देण्याची वेळ कोणत्याही विद्यार्थ्यावर येऊ नये, यादृष्टीने तारखा निश्चित केल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT