Sushil Kumar Shinde sakal
सोलापूर

सीमोल्लंघनाचा दिवस! नीलेश राणेंनंतर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती

धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सोलापूर : दसऱ्यानिमित्त आज सिमोल्लंघनाचा दिवस असताना राज्याच्या राजकारणातून दोन व्यक्तींनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विटद्वारे निवृत्ती जाहीर केली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील निवृत्तीचे संकेत दिले आहेत. (Former Congress Chief Minister Sushil Kumar Shinde announced his political retirement)

राजकाणातून निवृत्त

सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुशील कुमार शिंदे यांनी पुढच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, "मी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की प्रणिती ताईच काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहतील. मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखाच आहे. पण जी काही मदत लागेन ती मी करत राहीन हे मी तुम्हाला सांगतो.

इंडिया आघाडीचा पहिला उमेदवार जाहीर?

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांच्या या विधानामुळं आता नवी चर्चा सुरु झाली आहे. कारण सुशीलकुमार शिंदे हे राजकारणातून निवृत्त झाले म्हणजे काँग्रेसचा सोलापूरमधील लोकसभेचा उमेदवार म्हणजे प्रणिती शिंदेच असणार आहेत. (Latest Marathi News)

म्हणजेच मविआकडून किंवा इंडिया आघाडीकडून प्रणिती शिंदे यांच्यारुपानं पहिली उमेदवारी जाहीर झाल्यासारखंच आहे.

आंबेडकरांमुळं शिंदेंचा पराभव

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे उमेदवार होते. पण या निवडणुकीत सिद्धेश्वर स्वामी निवडून आले आणि खासदार बनले. पण या निवडणुकीपूर्वीच सुशील कुमार शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल असं जाहीर केलं होतं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT