SINHGAD
SINHGAD 
सोलापूर

"सिंहगड'च्या चार विद्यार्थ्यांनी पटकावली दहा लाख पॅकेजची नोकरी ! 

संजय हेगडे

तिसंगी (सोलापूर) : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या वैभव कोळवले, कृष्णा सोनटक्के, अक्षय पैठणकर व महेश जाधव या चार विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून "बायजू' या नामांकित कंपनीत निवड झाली असून, त्यांना दहा लाखांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली. 

"बायजू'ने भारतातील "सर्वात आवडती शाळा' या शिक्षण ऍपची निर्माती केली आहे. या कंपनीत 1 ते 12 मधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल, आकर्षक आणि प्रभावी शिक्षण, कार्यक्रम तसेच एनईईटी आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी या कंपनीकडून घेण्यात येते. या कंपनीकडून वैभव कोळवले, कृष्णा सोनटक्के, अक्षय पैठणकर आणि महेश जाधव या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असून, कंपनीकडून प्रशिक्षण दरम्यान वार्षिक 3 लाख रुपये पगार देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वार्षिक 10 लाखांचे पॅकेज मिळणार आहे. भरपूर पगार घेणारे पंढरपूर सिंहगडमधील हे पहिलेच चार विद्यार्थी ठरले आहेत. 

बायजू कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्‍याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. भारत आदमिले, प्रा. दीपक कोष्टी, प्रा. विनायक पाटील, राजाराम राऊत आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सोईसुविधा, तणावमुक्त शिक्षण पद्धती, इन्फ्रास्ट्रक्‍चर, निकाल या सर्व गोष्टींवर प्लेसमेंटची विश्वासार्हता विद्यार्थांना सिंहगड इन्स्टिट्यूटमधून मिळत असल्याने आज अनेक कंपन्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधील इंजिनिअर निवडीसाठी महाविद्यालयात प्लेसमेंटसाठी येत आहेत. भविष्यातही जास्तीत जास्त इंजिनिअर आम्ही उत्कृष्ट पद्धतीने घडविणार आहोत. 
- डॉ. कैलाश करांडे, 
प्राचार्य, सिंहगड इन्स्टिट्यूट, पंढरपूर 

पंढरपूर सिंहगड कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग असून, विद्यार्थ्यांकडून कंपनीत आवश्‍यक असलेल्या सर्व गुणांची प्लेसमेंट विभागाकडून तयारी करवून घेतली जाते. 
- वैभव कोळवले, 
विद्यार्थी, बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT