Fraud
Fraud Sakal
सोलापूर

बनावट नवरी उभी करून पंधरा हजारांची फसवणूक, सात जणाविरोधात गुन्हा दाखल

राजकुमार शहा

लग्न लावून देतो म्हणून बनावट नवरी उभी करून पंधरा हजारांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी नवरीसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ - लग्न (Marriage) लावून देतो म्हणून बनावट नवरी (Fraud Bride) उभी करून पंधरा हजारांची फसवणूक (Cheating) करण्यात आल्याप्रकरणी नवरीसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्वांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबाची वाडी, ता. मोहोळ येथील बंडु महिपती नरके यांचा विवाह जमवण्यासाठी त्यांनी एंजट युवराज विठ्ठल जमदाडे रा. भोसे, ता. पंढरपुर. याला लग्न जमण्यासाठी सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी लग्न लावण्यासाठी सव्वा लाख रुपये द्यावे लागतील, मुलगी दाखवल्यावर पाच हजार वेगळे द्यावे लागतील, साखरपुडा ठरल्यास विस हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांनी बंडू नरके यांना मुलगी पाहाण्यासाठी केव्हा येतो, अशी विचारणा केली. दुसऱ्या दिवशी मुलगी पाहण्यासाठी सोलापूर येथे बोलावले. युवराज जमदाडे हे एका महिलेसह एसटी स्टँडवर आले. तेव्हा बंडू नरके व त्याचा चुलत भाऊ, मामा, भावजय यांना एजंट जमदाडे यांने मुलगी दाखवली व तीचे नाव स्वाती पवार असे संगीतले. तसेच ती पसंत आहे का? अशीही विचारणा केली. तिचे आई-वडील मयत झाले आहे. तिचे नातेवाईक आम्हीच आहोत, असे सांगुन पसंत आहे.

तर आता वेळ कशाला घालवता साखरपुडा करून टाकु, असे म्हणून साखरपुड्याचा कार्यक्रम केला. ता. 19 एप्रिल रोजी विवाहाची 20 तारीख काढण्यात आली. त्या दिवशी घरासमोर लग्न मंडप टाकून लग्नाची तयारी जोरदार केली. दुपारी एक वाजता लग्न असल्याने सर्वजण मुलीची वाट पाहत असताना आमची गाडी एका हॉटेल जवळ बंद पडल्यामुळे आम्ही एसटीने अनगर येथे आलो आहोत आम्हाला गाडी पाठवा म्हणून सांगितले. मुलीला व पाहुण्यांना आणण्यासाठी गाडी पाठवली, पाहुणे मंडळी लग्नात पोहचली, पण विवाहास नवरी उभी करताना तिच्या पायात जोडवे घालताना नातेवाईकांना पुर्वी जोडवे घातलेल्याचे वण आढळले.

याबाबत चौकशी केली असता, मुलीस मराठी येत नाही म्हणून सांगितले. पण मुलीची अधिक चौकशी केली असता मुलीचे खरे नाव सायरा रफिक शेख वय-25, रा. विडी घरकुल, सोलापूर असे तिने सांगितले. तेव्हा आपली फसवणुक होत आहे हे लक्षात आले खोटी नवरी खोटी दाखवून 15 हजार रुपयांची फसवणूक केली. म्हणून बंडू महिपती नरके यांनी एजंट युवराज विठ्ठल जमदाडे रा. भोसे, नवरीचा भाऊ सर्फराज सलीम रा. कुमठा नाका, सोलापूर, चैतन्य प्रल्हाद गायकवाड रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर. शिवगंगा चैतन्य गायकवाड शाहीर वस्ती, सोलापूर. शुभांगी सोमनाथ अधटराव रा. शिरापूर, ता. मोहोळ व महानंदा चितानंद म्हेत्रे रा. विडी घरकुल, सोलापूर. अशा सात जणा विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास हवालदार सचिन मुसळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT