Andolan 
सोलापूर

तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही 

सकाळ वृत्तसेवा


मोहोळ (सोलापूर) : लॉकडाउनचे कारण पुढे करून ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रांनी 34 ते 35 रुपये प्रतिलिटर असणारा दुधाचा भाव अचानकपणे कमी करून, केवळ 20 रुपये केला. तशा आशयाचे शासनाचे कुठलेही आदेश नाहीत. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दूध संकलन संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कमी दिलेला प्रतिलिटर पाच रुपयांचा फरक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावा, या मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेने मोफत दूध वाटप आंदोलन केले. मोहोळसह अन्य तालुक्‍यांतील सुमारे 40 गावांत सुमारे पाच हजार लिटर दूध मोफत वाटून आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे. 

गेल्या सुमारे अडीच महिन्यांपासून संपूर्ण राज्यात लॉकडाउनची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून दुधाला योग्य भाव द्या, असे सांगितले होते. मात्र त्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत दूध संकलन केंद्र चालकांनी मनमानी करून पाच रुपये प्रतिलिटर दुधाला कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. केवळ 20 रुपये लिटर दर दिला आहे. दूध संघानेही दुधाची पावडर व इतर उपपदार्थ करून त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. शेतकरी मात्र कंगाल झाला आहे. सध्या दुभत्या जनावरांना लागणारे पेंड, पशुखाद्य, भुसा, मका भर्डा यांचे दर आकाशाला भिडले आहेत. असे असले तरीही दुधाचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर दिले जात नाहीत. पशुखाद्य व इतर खाद्याचे दर कमी करावेत, या मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. तशी परिस्थिती उद्‌भवली तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद केले आहे. या वेळी जनहितचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले; सत्कार स्वीकारायला आले अन्...

Ahmedabad Plane Crash: जळालेली झाडे अन् काळवंडलेल्या भिंती; अपघाताला महिना झाल्यानंतर वसतिगृहाची स्थिती

Education News: विकसित महाराष्ट्रासाठी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात; उच्च, तंत्रशिक्षण विभागाचा पुढाकार

Parbhani Teacher Video: गुरुजींचा ‘मॉर्निंग पेग’, दारू पीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल | Sakal News

Nashik Godavari River : गोदापात्रात सापडले दोघांचे मृतदेह; तीन दिवसांनंतर अग्निशामक विभागाच्या शोधमोहिमेस यश

SCROLL FOR NEXT