gram panchayats denied water supply of Andhalgaon scheme solapur
gram panchayats denied water supply of Andhalgaon scheme solapur sakal
सोलापूर

निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीने आंधळगाव योजनेचा पाणीपुरवठा नाकारला

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : स्वतःची योजना असल्यामुळे निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीने आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा नाकारला तर बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या ट्रायल कालावधीतील बिल ग्रामपंचायतीने का भरायचे असा प्रश्न उपस्थित करत ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पुन्हा हस्तांतरित करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.

आ. समाधान आवताडे यांनी आंधळगाव व भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी व ग्रामसेवक व सरपंच यांची बैठक लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली या बैठकीस मंजुळा कोळेकर माजी सभापती प्रदीप खांडेकर सुधाकर मासाळ सचिन शिवशरण सुरेश ढोणे, शशिकांत चव्हाण लक्ष्मण मस्के येताळा भगत दत्तात्रेय साबणे मनीषा खताळ जमीर मुलाणी,अॅड बापूसाहेब मेटकरी यांच्यासह पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी व संबंधित गावचे ग्रामसेवक सरपंच उपस्थित होते आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत या दुरुस्तीसाठी दहा कोटीचा निधी नुकताच मंजूर झाला आहे.

या या योजनेतून ममदाबाद शे., कचरेवाडी, अकोला,मारापुर,घरनिकी, मल्लेवाडी,धर्मगाव,ढवळस,देगाव, या ग्रामपंचायतीने या नदीचे पाणी घेण्यास नकार दिला तर आंधळगाव लक्ष्मी दहिवडी दामाजी नगर चोखामेळा नगर या ग्रामपंचायतीने पाणी घेण्यास सरकार होकार दिला असला तरी प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला तर अधिकाऱ्यांनी या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक वर्ष लागतील असे सांगताच सध्या पाणी तात्काळ सुरू करण्यासाठी उपाययोजना कधी करणार यावर अधिकारी निरुत्तर झाले. ढवळस चे सरपंच सिद्धेश्वर मोरे यांनी 2006 पासून या आंधळगाव योजनेतून पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही त्यामुळे आमचे गाव यातून वगळण्याची मागणी करून देखील वगळले जात नाही. तर भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील पाणीपट्टी वसुली 38 लाख रुपये तर वीज बिल एक कोटी 16 लाख रुपये आहे योजना हस्तांतरित करताना 68 लाख रुपये बिल थकीत होते सदरचे बिल संबंधित खाते व ठेकेदाराकडून भरून घ्यावे अशी मागणी लक्ष्मण मस्के यांनी केले सलगर खुर्द विठ्ठल सरगर यांनी भोसे योजना सुरू झाल्यापासून एकदाही टाकीत पाणी गेले नाही मग पाणीपट्टी का भरायची असा प्रश्न उपस्थित केला. पाणीपट्टी भरली नसताना पोटनिवडणुकीच्या काळात पाणी सोडून अधिकाय्रांनी राजकारण केल्याचा आरोप खुपसंगी बिरा लवटे यांनी केला. प्राध्यापक येताळा भगत यांनी या योजनेमध्ये अधिकार यांची मिलीभगत असून काम अर्धवट असताना योजना हस्तांतरित का केली ? असा प्रश्न उपस्थित केला.

माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी शिखर समिती चालू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे द्यावी अशी मागणी केली सुधाकर मासाळ यांनी करताना अधिकाऱ्यांनी या योजनेतील गावकऱ्यांची दिशाभूल केली. शिरनांदगीचे गुलाब थोरबोले यांनी सध्या या पाण्याची गरज नसली तरी भविष्यात पाणी लागू शकते योजना सुरु करण्याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आ. समाधान आवताडे यांनी कागदावर पूर्ण असलेली भोसे योजना सध्या अनेक गावकऱ्यांच्या तक्रारींमुळे सलगर खु,सोड्डी,शिवनगी,येळगी,आसबेवाडी,लेंडवे चिंचाळे गावाला पाणी मिळत नाही ते समोर आले आहे. पाणी मिळत नसताना हस्तांतरित का केली शिखर समीतीच्या गळ्यात का टाकली असा उपस्थित असा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर लक्ष द्यावे अन्यथा या योजनेची चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असा इशारा अधिकाऱ्याना दिला आ. आवताडे यांनी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महावितरणचे अधिकारी यांना फोन वरून ही योजना सुरु करण्याबाबत प्रयत्न केले व वाढीव बिलावरून महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी ला भेटून तोडगा काढण्याबाबत सूचना यावेळी शिखर समितीला देण्यात आल्या. व योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याबाबत उपस्थिताचे व शिखर समितीचे मत जाणून घेतले. आभार दिगंबर यादव यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT