Halgi
Halgi 
सोलापूर

हलगी अन्‌ पाखरांमध्ये रंगली जुगलबंदी ! "कडकडाटात' द्राक्षबागेची राखण; तरी दाद देईनात पाखरं

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आता हलग्यांच्या कडकडाटात बागांची राखण करू लागले आहेत. पाखरांपासून द्राक्ष बागांच्या राखणीत काळानुरूप झालेला बदल हा पर्यावरणाला पूरक ठरतोय, हे विशेष.

ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असली, तरी आता ज्वारीपेक्षा फळबागांचा जिल्हा म्हणून पुढे येऊ लागला आहे. रब्बी ज्वारीचा हंगाम नुकताच संपला आहे. त्यामुळे ज्वारीवरील पाखरांनी नवे भक्ष्य म्हणून आपला मोर्चा द्राक्ष बागांवर वळवला आहे. भोरड्यांचे थवेच्या थवे बागेतील द्राक्ष घड फस्त करत आहेत. तर शेतकऱ्यांचा डोळा चुकवून बुलबुल पक्षी मस्त आणि मजेत द्राक्ष मण्यांचा फडशा पाडताहेत, जणू हे पक्षी आज बागेत पार्टी करायलाच आलेत. 

पूर्वी शेतकऱ्यांनी पाखरांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी बागांवर जाळी लावली होती. या जाळीत अडकून अनेक पक्षी मरत होते. त्यानंतर बागेत पाखरांना पांगवण्यासाठी दारूच्या बंदुकीचा आवाज केला. हा प्रयोगही धोकादायकच ठरला. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी आपल्या सालगड्याची नेमणूक खास पाखरांपासून द्राक्ष बागेच्या राखणीवरच केलेली दिसते. त्यासाठी खास कडकडाट करणारी हलगी त्याला घेऊन दिली आहे. विटे भागातील द्राक्ष बागांची पाहणी केली तेव्हा भल्या पहाटेपासून अंधार पडेपर्यंत सगळीकडे हलग्यांचा नाद घुमत होता. हलगी घुमत होती आणि पाखरांचे थवे सुर्रकन उडत होते. या ओळीतून त्या ओळीत बसत होते. हलगीवाला फिरून पुरता दमत होता. द्राक्ष बागांमधील हलगी व पाखरांमध्ये रंगलेली जुगलबंदी सगळीकडे पाहायला मिळत आहे. 

काही काही पाखरं हालगीच्या आवाजालाबी लवकर दाद देत न्हायत. म्हणून त्यांच्या जवळ जाऊन हालगी वाजवली की, पाखरं उडून जात्यात. 
- धोंडिबा परकाळे, 
हलगीवाला, विटे, ता. पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT