Kille banva sprdha Solparu Mehata Highschool.jpeg
Kille banva sprdha Solparu Mehata Highschool.jpeg 
सोलापूर

सोलापुरात साकारला हुबेहुब रामशेज, पारगड किल्ला 

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर ः यंदा कोरोनामुळे शाळा बंद असली तरी जुळे सोलापूरच्या कै. वि. मो. मेहता माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर व सोशल डिस्टस्टिंगचे पालन करीत रामशेज व पारगड या दोन किल्ल्यांची बांधणी केली. 

दरवर्षी सोलापूरात होणाऱ्या किल्ले बांधणी स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेला किल्ला लक्षवेधी व बक्षिसपात्र ठरत असे. यंदा या विद्यार्थ्यांनी रामशेज व पारगड या दोन किल्ल्यांची उभारणी केली आहे. शाळा बंद असूनही शाळेच्या प्रांगणात अगदी मोजक्‍याच विदयार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवून स्वच्छतेचे भान राखून हे किल्ले तयार केले. रामशेज किल्ला नाशिकच्या उत्तरेला नाशिकपासून 14 किलोमीटर अंतरावर आशेवाडी गावाजवळ आहे. बांधणी केलेला दुसरा पारगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यात आहे. चंदगडपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 दरम्यान हा किल्ला बांधला. रायबा मालुसरे हे त्याचे पहिले किल्लेदार होते. या किल्ल्यावर सुभेदार तानाजी मालुसरे व अन्य मावळ्यांचे वंशज आजही आहेत. 

या दोन्ही किल्ल्यांची विद्यार्थ्यांनी बांधणी करताना पर्यावरणपूरक साहित्य वापरले आहे. कलाशिक्षिका मधुरा देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यशस्विनी कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले. मुख्याध्यपिका श्रुती बागेवाडी, पर्यवेक्षिका सुस्मिता तडकासे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT