Heavy Rain
Heavy Rain 
सोलापूर

वाहव्वा..! पंढरपूर तालुक्‍यात ‘तरुण’ पावसाची जबरदस्त एन्ट्री..! 

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : पंढरपूर शहर व परिसरात शुक्रवारी (ता. 9) पुनर्वसू नक्षत्रातील तरुण पावसाची जबरदस्त एंट्री झाली. तालुक्‍यात सरासरी 23 मिलिमीटर पाऊस पडला असला तरी करकंब, पटवर्धन कुरोली व भाळवणी या तीन मंडळात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे या मंडळात ओढे व नाले भरून वाहिल्याने शेताच्या तालीही फुटल्या आहेत. तरुण पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसात नागरिकांनी गरमागरम भजी, वडापाव व सामोशावर ताव मारला. 

पंढरपूर तालुक्‍यात यंदा कमीअधिक प्रमाणात सुरवातीपासूनच चांगला पाऊस पडत गेला. गेल्या अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्राच्या पावसाची सर्वदूर हजेरी लागली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे चांगले नियोजन केले होते. शेतकऱ्यांची खरिपातील पिकांच्या पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. अशा परिस्थितीत रोपळे व परिसरातील आढीव, विसावा, पांढरेवाडी, बाभूळगाव व मेंढापूर या परिसरात सुमारे एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरवात झालेल्या पावसाने दीड तास झोडपून काढले. या पावसामुळे ओढे भरून वाहू लागले आहेत. शेताच्या तालीही फुटल्या आहेत. खरिपात पेरलेली कडधान्ये व तृणधान्याची पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून आले. शेतातून पाणी निघाल्याचे चित्र अनेक दिवसांनंतर पाहायला मिळाले. 

तरुण पाऊस का म्हणतात? 
पुनर्वसू नक्षत्रातील पहिल्या चरणात पडणाऱ्या पावसाला ग्रामीण भागात तरुण पाऊस म्हणून ओळखतात. पंढरपूर तालुक्‍यात गुरुवारी सर्वात जास्त पाऊस पटवर्धन कुरोली मंडळात 46 मिलिमीटर पडला. तर पळूज मंडळात सर्वात कमी नऊ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. 

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
करकंब 31, पटवर्धन कुरोली 46, भंडीशेगाव 15, भाळवणी 38, कासेगाव 16, पंढरपूर 20, तुंगत 20, चळे 9, पुळूज 12, सरासरी पाऊस 23 मिलिमीटर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT