Students esakal
सोलापूर

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या ‘या’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणार सर्व दाखले

दहावी व बारावीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी आवश्‍यक असलेले दाखले व कागदपत्रे वेळेत व एकाच ठिकाणी सहजपणे मिळणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना कोणत्या ठिकाणी कागदपत्रे घेऊन येता येईल, अशी ठिकाणे शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य सांगतील.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची परिक्षा दिली आहे, त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी आवश्‍यक असलेले दाखले व कागदपत्रे वेळेत व एकाच ठिकाणी सहजपणे मिळणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना कोणत्या ठिकाणी कागदपत्रे घेऊन येता येईल, अशी ठिकाणे शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य सांगतील. त्यानुसार त्याठिकाणी (प्रत्येक तालुक्यात) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी महसूल प्रशासनाने केलेल्या या नियोजनामुळे विद्यार्थी व पालक यांची मोठी धावपळ वाचणार आहे.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, या विशेष कॅम्पच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापक व प्राचार्य, जिल्ह्यातील तहसीलदार यांची आम्ही बैठक आयोजित करत आहोत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र चालकांची बैठक घेतली जाणार आहे. विशेष कॅम्पमध्ये आलेले प्रस्ताव महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून अपलोड केले जाणार आहेत. त्यानंतर हे प्रस्ताव लगेचच मंजूर केले जाणार आहेत. शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना डोमिसाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, अशी कागदपत्रे आवश्‍यक असतात.

ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी बहुतांश पालक- विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात पुढे येतात. त्यामुळे तहसील कार्यालय पातळीवरील कामाचा ताण, महा-ई-सेवा केंद्राच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना वेळेत कागदपत्रे मिळत नाहीत. त्या ठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होते. वेळेत शैक्षणिक दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हे सर्व धोके टाळण्यासाठी यंदा सोलापूर जिल्हाभरात ठिकठिकाणी विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी शैक्षणिक कागदपत्रे देण्याचे नियोजन

विद्यार्थी व पालक यांच्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने विशेष उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे कामात सुटसुटीतपणा येईल, यंत्रणेवरही अचानक येणारा ताणही वाचेल. कमी खर्चात, कमी वेळेत विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखले मिळतील. त्यामुळे त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सहज व सुलभ होईल.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT