solapur
solapur sakal
सोलापूर

Solapur : सहकारी बँकेकडून साखरेच्या मूल्यांकनात वाढ

सकाळ वृत्तसेवा

माळीनगर : खुल्या बाजारात साखरेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन माल तारणातील खुल्या साखरेचा सुधारित मूल्यांकन दर ३१०० रुपयांवरून ३४०० रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. तसेच कर्ज मार्जिन (दुरावा) १५ वरून १० टक्के केल्याने पोत्यामागे बँकेकडून आता ८५ टक्के ऐवजी ९० टक्के कर्ज दिले जाणार आहे.

२८ डिसेंबर २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाने ऊस उत्पादकांना ऊसबिले देण्यासाठी कारखान्यांना मोठी मदत होणार आहे. साखरेचे सुधारित मूल्यांकन ३४०० रुपये प्रतिक्विंटल केल्याने उचल दर ३०६० रुपये क्विंटल इतका राहणार आहे. साखरेचा मूल्यांकन दर वाढविल्याने सध्या कारखान्याकडे शिल्लक असलेल्या हंगाम २०२३-२४ मधील उत्पादित साखर पोत्यांपैकी विक्री योग्य अवस्थेत असलेल्या साखर पोत्यांचेच मूल्यांकन वरील दराने केले जाणार आहे.

२०२३-२४ हंगामातील उत्पादित शिल्लक साखर यापूर्वी कळविल्यानुसार १० टक्के दुरावा राखला जाईल. तसेच एक वर्षावरील (जुन्या) साखर साठ्यावर पूर्वीप्रमाणेच प्रतिवर्ष पाच टक्के दुरावा वाढविला जाणार आहे. तीन वर्षावरील साखरसाठा कर्ज उचलीस पात्र असणार नाही. कारखान्याने मध्यम मुदत, आर.आर.टी.एल. कर्जाची वसुली नसल्याने हंगाम २०२३-२४ साठी वाढीव अल्पमुदत कर्ज मंजूर केले असल्यास अगर गाळपाअभावी टॅगिंगने पूर्ण कर्ज वसुली होणार नसल्यास त्यापोटी निगडित वसुली कोणत्याही परिस्थितीत केन पेमेंट वा अन्य कारणासाठी उपलब्ध करून दिली जाणार नाही. ही वसुली अल्पमुदत कर्जापोटी जमा करून घेतली जाणार आहे.

यंदा प्रतिक्विंटल १०० रुपये अतिरिक्त टॅगिंग

बँक स्थायी तपासणी अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली कमी प्रतीची (खराब) साखर पोती तसेच प्रॉव्हिडंट फंड वा अन्य शासकीय यंत्रणेने जप्त केलेल्या साखर पोत्यांचे पूर्वीप्रमाणेच मूल्यांकन १३०० रुपये प्रतिक्विंटल दराने केले जाणार आहे. चालू गळीत हंगामात अंदाजित गाळपापेक्षा प्रत्यक्ष कमी गाळप होणार असल्याने बँक कर्जाच्या वसुलीकरिता प्रतिक्विंटल १०० रुपये अतिरिक्त टॅगिंग आकारले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT