Vishwajit Bandgar
Vishwajit Bandgar Canva
सोलापूर

तौक्ते चक्री वादळात अडकलेल्या युवकाला नौदलाकडून जीवदान

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : तौक्ते चक्री वादळाच्या (tauktae cyclone) तडाख्यात मुंबईला (Mumbai) नोकरीसाठी गेलेला मंगळवेढा तालुक्‍यातील (Mangalwedha) खुपसंगी येथील विश्वजित बंडगर हा नवविवाहित तरुण अडकला. तब्बल साडेचौदा तासांनंतर त्याची सुटका नौदलाने (Indian Navy) केल्यानंतर दुःखाचा डोंगर पसरलेल्या गावाकडील पत्नी, भाऊ, आई, वडील यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. (Navy rescues youth from Mangalwedha taluka caught in tauktae cyclone)

तालुक्‍यातील खुपसंगी येथील विश्वजित बंडगर याची घरची आर्थिक परिस्थिती असमाधानकारक होती. आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे म्हणून सोलापूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वेल्डरचे प्रशिक्षण घेऊन तो नोकरीच्या निमित्ताने 25 नोव्हेंबरला मुंबईला गेला. तेथे मेथो असोसिएशन या कंपनीत काम करत असताना तो समुद्रामध्ये बार्जमधून त्याच्या इतर साथीदारांसोबत गेला. चक्रीवादळ सुरू झाल्यानंतर समुद्रातील इतर बार्ज निघून आल्या. मात्र मागे राहिलेली बंडगर यांची बार्ज तौक्ते वादळाच्या तडाख्यात सापडली.

वादळामुळे समुद्रात 15 मीटरपेक्षा मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. यामुळे घबराट पसरली होती. संरक्षक जॅकेट घालून सर्वांनी उड्या मारल्या आणि तब्बल साडेचौदा तास या सर्वांचा पाण्यात जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. त्याच्यासोबत असलेले इतर काही सहकारी या वादळाच्या तडाख्यात वाहून गेले. त्यामुळे जोपर्यंत मदतीला कोणी येत नाही, तोपर्यंत आपण वाचू शकणार नाही, अशी खात्री मनात असताना केवळ इतर सहकाऱ्यांनी एकमेकाला धीर देत साडेचौदा तास पाण्यात काढले. खिशात असलेली रोख रक्कम व मोबाईल देखील पाण्यात भिजून बंद पडल्यामुळे त्यांना घरच्यांशी संपर्क होत नव्हता. अशा परिस्थितीत घरातील वातावरण दु:खमय झाले होते. पाण्यात जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच शेवटी हवाई दलाचे विमान त्यांच्या मदतीला आले. जेव्हा त्यांना हे विमान समोर दिसले, त्या वेळी या सर्वांच्या जिवात जीव आला आणि नौदलाने सोडलेल्या दोरीच्या सहाय्याने हे तरुण सहकारी सुखरूप परतले.

रविवारी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी त्याने आपल्या आई-वडील व पत्नीशी संपर्क साधला होता. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे घरच्यांनी मुंबईला जाण्याची तयारी केली. मात्र मुंबईवरून आपण सुखरूप असल्याचा फोन आल्यामुळे घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. जगण्यासाठीच्या संघर्षामध्ये त्याच्या डोक्‍याला किरकोळ मार लागला असून समुद्रातील क्षारयुक्त पाणी कानात गेल्यामुळे ऐकण्यासाठी त्रास होत आहे.

तौक्ते वादळामुळे निर्माण झालेल्या समुद्री संघर्षाशी लढलेला माझा भाऊ वाघ ठरला. घरच्या परिस्थितीत आम्ही संघर्ष केला. आजही संघर्ष करून आलेल्या संकटावर मात केली. नौदल व देवाने आमच्यावर उपकार केले, असे विश्‍वजित बंडगर याचा भाऊ विनोद बंडगर यांनी सांगितले.

समुद्रात बुडणाऱ्या टायटॅनिक चित्रपटातील चित्तथरारक अनुभव आम्ही स्वतः घेतला. संपर्क होत नसल्यामुळे गावाकडील लोक रडत होते. ते मुंबईला येण्यासाठी निघाले होते. ज्या वेळी फोन करून त्यांना आम्ही सुखरूप असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या संकटातून आम्ही वाचलो ते भारतीय नौदलामुळेच. तेच आमच्यासाठी देव आहेत.

- विश्वजित बंडगर, खुपसंगी, ता. मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT