Voting Awareness
Voting Awareness sakal
सोलापूर

Voting Awareness : चिमुकल्यांच्या हाती ‘मतदान करा’ची चिठ्ठी ; मतदारांची टक्केवारी वाढीसाठी शाळांमध्ये उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : जिल्ह्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात २० लाख नऊ हजार ५२२ तर माढा मतदारसंघात १९ लाख ८१ हजार १५० मतदार आहेत. निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आता शाळांमधील चिमुकले त्यांच्या आई-वडिलांना आवाहन करतील.

त्यासाठी सर्व शाळांमध्ये २६ मार्च रोजी ‘मॅजिकल चिठ्ठी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘आई-बाबा मतदान करा’ अशी चिठ्ठी मुलांना दिली जाणार असून, ती घरी गेल्यावर पालकांसमोर वाचून दाखवायची आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मागील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असलेल्या गावांमध्ये, मतदान केंद्रांमध्ये जाऊन जनजागृती केली.

तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्येही जागृती केली. आता जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्वीप कार्यक्रम राबविला जात आहे. त्यात मॅजिकल चिठ्ठी, मतदान संदेश व्हिडिओ, मतदान शपथ, मतदान रॅली, प्रभात फेरी, मानवी साखळी व रांगोळी स्पर्धा असे उपक्रम आहेत. २६ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये मॅजिकल चिठ्ठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

मॅजिकल चिठ्ठी उपक्रम म्हणजे काय?

महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्वच आस्थापनांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक मॅजिकल चिठ्ठी या उपक्रमात सहभागी असणार आहेत. केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याविषयी ‘आई-बाबा मतदान करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहावी व ती पालकांना वाचून दाखवावी असा हा उपक्रम आहे. त्यानंतर त्यासंबंधीचे छोटे छोटे व्हिडिओ देखील तयार केले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT