सोलापूर

Solapur News : करकंबच्या युवकाचे अवयवदान; मात्र, विमानसेवेअभावी हृदयदान अशक्य

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - करकंब येथील युवकाच्या ब्रेनडेडनंतर नातेवाईकांनी त्याचे नुकतेच अवयवदान केले. मात्र, सोलापूर विमानसेवा नसल्यामुळे दात्याची इच्छा व रुग्ण उपलब्ध असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे हृदयदान करता आले नाही. विमानसेवेशिवाय जिल्ह्याचे मेडीकल हबचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १८-१९ जणांनी अवयदान केले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांची इच्छा असली तरी सोलापूरहून चेन्नई, मुंबई, हैदराबाद, दिल्ली या ठिकाणी सहा तासाच्या आत पोचण्याची कोणतीही सुविधा नाही. यामुळे इच्छा असली तरी देखील अवयवदान करणे अशक्य होत आहे.

सोलापूर शहरात प्रसन्न कासेगावर यांच्या सीएनएससह डॉ. मुदखन्ना यांच्यासारख्या मेंदूरोगावर इलाज करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण संख्या मोठी असते. याठिकाणी अधूनमधून रुग्णांचा मेंदूमृत्यू (ब्रेनडेड) होतो. या रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाची इच्छा असली तरी ते वेळत पोचविण्यासाठी अडथळे येत आहेत.

दोन हॉस्पिटलच्या पथकाचे परिश्रम

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील १८ वर्षीय युवक प्रतिक राहुल पिसे याचा नुकताच अपघात झाला. अपघातानंतर करकंब येथे प्रथोमपचार करून अतिशय गंभीर अवस्थेत चंदन न्यूरो सायन्सेस हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. सीएनएस हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होताच सर्व अत्यावश्यक उपचार सुरु करण्यात आले. मात्र दोन दिवसानंतरही सुधारणा होत नसल्याचे व मेंदूची कार्यक्षमता कमी होत असल्याचे डॉक्टरांना जाणवले.

त्यामुळे सीएनएस हॉस्पिटलच्या डॉ. प्रसन्न कासेगावकर, डॉ. विजय जोशी, डॉ. मधुरा विभुते, डॉ. निखिल नवले, डॉ. विशाल गोरे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून रुग्णाच्या मेंदूच्या कार्यक्षमतेबाबत तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती रुग्ण हा मेंदू मृत असल्याचे आढळून आले. डॉ. पल्लवी मेहता, डॉ. प्रवीण माळी, डॉ. गोरख रोकडे व कर्मचाऱ्यांनी अवयव दानाचे पवित्र कार्य करण्यासाठी नातेवाईकांची मन धरणी केली.

नातेवाईकांना कडून अवयवदानाची परवानगी मिळताच पुढील प्रक्रियेला सुरवात झाली. या प्रक्रियेमध्ये पुणे व सोलापूर येथील अनेक डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत. रुग्णाच्या अवयव प्राप्तीसाठी पुणे येथील नामांकित रुग्णालयाचे पथक शनिवारी (ता.२५) रात्री तीनच्या सुमारास सोलापूरच्या सीएनसी हॉस्पिटल येथे दाखल झाल्या.

दोन्ही हॉस्पिटलच्या संयुक्तिक प्रयत्नानंतर रुग्णांच्या दोन किडनी व डोळे यांची पुनर्प्राप्ती करण्यात यश मिळाले. शस्त्रक्रियेनंतर अवयवांच्या वाहतुकीसाठी सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण पोलिस यांनी ग्रीन कॉरिडॉर तयार करून अवयव वेळेत पोचविले. विमानसेवा असती तर हृदयदानही शक्य झाले असते.

काही दिवसांपूर्वी पंचकर्मासाठी विदेशातून येणाऱ्या रुग्णासाठी आम्हाला पुणे ते सोलापूर अशी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी लागली होती. प्रतिक राहुल पिसे याच्या हृदयदानासाठी रुग्णही उपलब्ध होता. मात्र सहा तासाच्या आत हृदय पोचविण्यासाठी विमानाची आवश्यकता होती. सोलापूरचे विमानतळ सुरू झाल्याशिवाय मेडिकल हब शक्य नाही.

- संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी, सीएनएस रुग्णालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT