माजी आमदार नारायण पाटील
माजी आमदार नारायण पाटील sakal
सोलापूर

करमाळा : कृष्णा-भीमेच्या पाण्याने महादेवास अभिषेक घालणार

सकाळ वृत्तसेवा

करमाळा : कृष्णा व भीमा नदीच्या पाण्याने भरलेल्या कलशातील पाण्याने (ता. ६) जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवास जलधारा अभिषेक घालणार असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली. सध्या करमाळा तालुक्यात पाटील गटाच्या वतीने उजनी परिषदेचे आयोजन जोरात चालू असुन या निमित्त १० पुनर्वसित गावांमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सभेत कार्यक्रमात सुरुवातीला उजनी कलशाचे पूजन संबंधीत गावातील जेष्ठ धरणग्रस्त शेतकऱ्यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी म्‍हणाले, ( ता. ५) रोजी उजनी परिषदेची सांगता शेलगाव (वां) (ता. करमाळा) येथील सभेने होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. ६) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून करमाळा तालूक्यातून हा उजनी कलश घेऊन आम्ही शिखर शिंगणापूर येथे जाणार आहोत. यावेळी अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या कलशाची पूजा करण्यात येईल. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना समवेत घेऊन त्यांच्‍या हस्ते शिंगणापूर येथील महादेवास जलाभिषेक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पाटील गटाच्या वतीने कृष्णा नदीतील पाणी एका कलशात आणले जाणार असुन कृष्णा व भीमा या दोन्ही नद्यांच्या एकत्रीत पाण्याने श्री शंभू महादेवास जलाभिषेक होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून प्रस्तावित पश्चीम महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सुखी करणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस लवकरात लवकर मंजुरी मिळून कार्यान्वित करण्यात यावी, असे साकडे श्री शंभु महादेवास घालण्यात येणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

या जलधारा कार्यक्रमाचे नियोजन चालू असून कृष्णा नदीतून कलश भरुन आणण्यासाठी काही युवकांवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तसेच श्री शंभू महादेव जलधारा अभिषेक सोहळ्यासाठी तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील व मोहिते-पाटील गटातील सर्व आजी माजी पदाधिकारी व महत्वाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT