grampanchayt.jpg
grampanchayt.jpg 
सोलापूर

करमाळा तालुका : देवळाली, सावडी, कुंभेज, उमरड, साडे येथे सत्तापरिवर्तन 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतीची सरपंच निवड आज शांततेत पार पडली. तालुक्‍यातील साडे, देवळाली, सावडी, पांडे, झरे, उमरड, पोथरे, आळजापूर, शेटफळ महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीने विशेष लक्ष वेधले होते. 
सरपंच, उपसरपंच निवडीत फोडाफोडीच्या राजकारणाच्या भितीने सर्वच गटाच्या नेतेमंडळीनी ग्रामपंचायत सदस्याची विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत निवडणूक निकालापासून सहलीवर गेलेले काही गावचे ग्रामपंचायत सदस्य आजच गावात आले. देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशिष गायकवाड यांची तर उपसरपंचपदी अश्विनी धनंजय शिंदे हे 13 पैकी 7 मते घेऊन विजयी झाले. पाटील गटाकडून सरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेले द्रोपती चांगदेव कानगुडे व उपसरपंच पदासाठी अर्ज केले कल्याण शेळके यांना सहा मते मिळाली. तर उमरड येथे आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे यांनी ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करत राजश्री बापू चोरमले यांना सरपंच पदाची संधी दिली आहे. उपसरपंचपदी अन्नपूर्णा बदे यांची निवड झाली आहे. उमरड येथे बिनविरोध निवडी पार पडल्या. कुंभेज ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून सरपंचपदी सिंधू गायकवाड व उपसरपंचपदी संजय तोरमल यांची बिनविरोध निवड झाली. साडे ग्रामपंचायतीवर आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या गटाच्या अनिता शशिकांत पाटील व उपसरपंचपदी मंगल अर्जुन पाटील यांची निवड झाली आहे. झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाचे मच्छिंद्र पांडुरंग घाडगे तर उपसरपंच पदी सुनिता कांबळे यांची निवड झाली आहे. येथे युवा नेते प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढवली गेली होती. 
विरोधी गटाकडून सरपंचपदासाठी लक्ष्मी नारायण अमृळे, सोमनाथ महादेव घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 
पांडे ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाच्या अनिता मोटे तर उपसरपंचपदी शिवाजी भोसले यांची निवड झाली तर विरोध सरपंचपदासाठी योगीता नितीन दुधे यांना 5, उपसरपंच पदासाठी वर्षा लांडगे यांना 6 मते घेत पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जगताप गटाचे म्हैसूर डे यांची तर उपसरपंचपदी विद्यार्थ्यांनी थोरबोले यांची निवड झाली आहे. 


पाडळीत विरोधी गटाची ऑफर स्वीकारली 
पाडळी ग्रामपंचायत निवडी बागल-पाटील युतीला 6 तर जगताप-शिंदे गटाला 3 जागा मिळाला होत्या. बागल-पाटील यांच्याकडे स्पष्ट बहुमत असतानाही सरपंच कोण होणार? यावरून अंतर्गत मतभेद वाढत गेले यांचा फायदा माजी सरपंच गौतम ढाणे व विकास सोसायटीचे शहाजी शिंगटे यांनी घेत बागल पाटील गटाचे दोन सदस्य फोडत थेट सरपंच व उपसरपंच पदाची ऑफीर दिली. ही ऑफर स्वीकारत सरपंचपदी शिलावती पिंपरे व उपसरपंचपदी पांडुरंग ढाणे यांची निवड झाली. भास्कर पाटील यांना आपला सरपंच करता आले नाही. सरपंच पदासाठी छाया अशोक शिंगटे यांनी तर उपसरपंचपदासाठी रामहारी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT