eknath shinde
eknath shinde eknath shinde
सोलापूर

Solapur: ''सुटी बाजूला ठेवून अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा"

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर जिल्ह्यात अवकाळीने दोनच दिवसात प्रचंड नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुट्या बाजूला ठेवून दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी केली. शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी शनिवारी (ता.२९) बोलत होते.

मागील दोन दिवसात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच भागात पिकांचे नुकसान झाले आहे. आता दोन दिवस सुटी न घेता अधिकाऱ्यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन घ्यावेत. नेहमीचा पाऊस ही आपत्ती ठरवली तर त्यातील मदतीचे निकष व धोरण ठरवायला हवे. सरकारने नुसतीच घोषणा केली आहे असे त्यांनी नमूद केले.

पूर्वी साखर चोरून व आता राजरोसपणे इथेनॉल, को जनरेशनच्या नावाखाली कारखाने उसाच्या रिकव्हरीवर दरोडे घालण्याचे प्रकार सुरुच आहेत. केंद्राने दूध पावडर व बटर आयात करण्याचा चोंबडेपणा केल्यानेच दुधाचे भाव कमी होऊन उत्पादकांना फटका बसतो आहे.

बारसूप्रकरणी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणार

बारसू आंदोलनात पोलिस कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी गेले होते, की कोणाची सुपारी घेऊन चोऱ्या करण्यासाठी गेले होते हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावे. कोकणासारख्या भागात कोण्या उपटसुंभाचे ऐकून हापूस, काजू उत्पादन संकटात टाकण्याचे काम शासनाने करु नये. उलट मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांची भूमिका समजून घेत त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवे होते. महिलांचे कानातले दागिने घेणे, आंदोलकांवर लाठीचार्ज करणे हे प्रकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे नक्की नाहीत. आम्ही स्थानिक शेतकऱ्यांसोबत राहणारच आहोत.

मुख्यमंत्र्यांना सुटी नसते

मुख्यमंत्री दोन दिवस सुटी घेत असतील तर ते चुकीचेच आहे. अशी सुटी मुख्यमंत्र्यांना घेत येत नसते. उलट सुटी रद्द करुन प्रशासनाने पुढील दोन दिवसात अवकाळीचे नुकसानीचे पंचनामे करावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला सुरुवात; कोल्हापुरात शाहू महाराज, तर सांगलीत संजय पाटील आघाडीवर

India Lok Sabha Election Results Live : दोन्ही जागांवर राहुल गांधीची आघाडी...... सुरुवातीच्या कलमध्ये बघा कोण जिंकतंय NDA की INDIA?

Lok Sabha poll results: सुरुवातीचा पोस्टल मतांचा कल निकालाचे संपूर्ण चित्र का दाखवत नाहीत? जाणून घ्या

Lok Sabha Results Bengal Bomb Blast: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोठा बॉम्ब स्फोट, पाच जण जखमी... नेमकं काय घडलं?

Lok Sabha: एक्झिट पोल कितपत ठरणार खरे? महाराष्ट्रात भाजप पुन्हा ठरणार मोठा भाऊ? शिंदे- अजित पवारांचं काय? मविआ कितीचा गाठणार टप्पा

SCROLL FOR NEXT