lok sabha election narendra modi and uddhav thackeray meeting in solapur today Sakal
सोलापूर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता खऱ्या अर्थाने रंगत; सोलापुरात आज मोदी, ठाकरेंची सभा

पंतप्रधान मोदी यांची सभा दुपारी तर ठाकरे यांची सभा सायंकाळी असल्याने पंतप्रधान मोदींना ठाकरे काय प्रत्युत्तर देणार?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता खऱ्या अर्थाने रंगत वाढण्यास सुरवात झाली. सोलापुरातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (सोमवार, ता. २९) सोलापुरात सभा होत आहे.

पंतप्रधान मोदी यांची सभा दुपारी तर ठाकरे यांची सभा सायंकाळी असल्याने पंतप्रधान मोदींना ठाकरे काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील होम मैदानावर उद्या (सोमवार) दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.

या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे राज्यातील व जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापुरात दाखल झाले आहेत. भाजपसाठी मोदी यांची सभा महत्त्वाची असल्याने या सभेसाठी भाजपने सूक्ष्म नियोजन केले आहे.

सायंकाळी ६ वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा सोलापुरातील कर्णिकनगर येथील मैदानावर होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे.

आजपर्यंत ठाकरेंच्या आदेशाने शिवसैनिक भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याला अधिक महत्त्व आहे. उद्याच्या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे.

एकाच दिवशी सभेचा योग

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा वारंवार दौरा केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील राज्यभर सभेसाठी फिरत आहेत. एकाच दिवशी एकाच शहरात मोदी व ठाकरे यांची सभा होण्याचा योग राज्यात फक्त सोलापुरात आला आहे. एकाच दिवशी दोन्ही नेते सोलापुरात असल्याने उद्याच्या दोन्ही सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रीकृष्णाप्रमाणे कोणत्याही मुलाला तुरुंगात जन्माचे दुःख सहन करावे लागू नये; निदा खानला जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय म्हटले?

मोठी बातमी! गौतम गंभीरच्या निरोपाची वेळ जवळ आली... BCCI ने सुरू केलीय तयारी; कामगिरीवर नाराजी, नेमकं काय घडतंय?

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! मराठवाडा विद्यापीठात 'या' 55 जागांवर मिळणार थेट प्रवेश; कुलगुरूंचा मोठा निर्णय

Hingoli Earthquake: जमीन अन् माणसेही हादरली! मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्यांनी कळमनुरीकर भयभीत; खुल्या जागेत आश्रय घेत रात्र काढली जागून..

महाराष्ट्रातून थेट पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संपर्क? ATS कडून मुंबई ठाण्यासह १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी, नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT