श्री संत दामाजी सहकारी साखर
श्री संत दामाजी सहकारी साखर  sakal
सोलापूर

मंगळवेढा : दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल, दामाजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध,

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सोशल मीडियातून प्रसिद्ध दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेला निवडणूक कार्यक्रम प्रशासनाकडून आज अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आला.यामुळे प्रशासनाचा सावळागोंधळ सभासदा समोर आला.

कोरोनामुळे गेली काही महिने लांबणीवर पडलेली साखर कारखान्याच्या निवडणुक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक प्राधिकरण आणि घेतला त्यानुसार दामाजी कारखान्यासाठीच्या पात्र सभासदाची प्रारूप यादी गत महिन्यात 20 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर यादीमध्ये समावेश नसल्यांनी साखर सहसंचालकाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु तक्रारदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही व साखर सहसंचालक मनमानी व सत्ताधारी गटाला लाभ होईल या पद्धतीने कारभार करीत असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे सिध्देश्वर हेबांडे यांनी साखर आयुक्ताकडे केली होती तिथूनच निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याआधीच प्रशासनाला आरोपाला सामोरे जावे लागले त्यानंतरही काही पात्र सभासदांचा समावेश केला नाही म्हणून उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली.

दरम्यान 30 मे रोजी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम व्हाट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये आला. व तो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला.शिवाय 31 मे रोजी त्या बाबतच्या बातम्या देखील प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाल्या.याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता आपण अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसल्याचे सांगितले. जाहीर न केलेला निवडणूक कार्यक्रम सोशल मीडियातून जाहीर कसा झाला ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला व प्रशासनाकडून याबाबत हातवर करण्यात आले, निवडणुक गोपनीय असते शिवाय निवडणूक प्रक्रिया गांभीर्याने हाताळण्यास हवी असताना प्रशासनाने गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.

कारखान्याचे सत्ताधारी हे भाजपाचे आमदार आहेत तर त्यांचे संभाव्य विरोधक राज्य सरकारचे समर्थक आहेत त्यामुळे निवडणूक प्रक्रिया कोणाच्या तरी सोयीची होईल अशी भूमिका प्रशासनाने न घेता त्रयस्थपणे व गांभीर्याने पार पाडण्याची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून राजकीय आरोप-प्रत्यारोपात प्रशासनाचा बळीचा बकरा होऊ नये. निवडणूक प्रक्रिया संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी सोशल मीडियामध्ये येऊ लागल्यामुळे ही निवडणूक पूर्ण होण्याआधी आणखीन कोण कोणत्या गोष्टी समोर येणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या त्यामुळे ही निवडणूक प्रशासन किती गांभीर्याने घेणार की सावळ्या गोंधळात पार पडणार याबाबत सभासदातून विचारणा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT