Naomi Satam
Naomi Satam sakal
सोलापूर

Naomi Satam : यूपीएससी परीक्षा ही सहज ट्राय करून बघण्याची परीक्षा नाही

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - यूपीएससी परीक्षा ही सहज ट्राय करून बघण्याची परीक्षा नाही. ध्येय निश्चित करून योग्य दिशेने पूर्ण वेळ झोकून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते. माध्यमिक शाळेत असतानाच इतर अधिकाऱ्यांना पाहून आपणास अधिकारी व्हायचे आहे, हे स्वप्न मी पाहिले आणि वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झाल्याचे प्रतिपादन प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी व्यक्त केले.

श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व आयक्यूएसी यांच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश' या उपक्रमांतर्गत त्यांनी युवकांशी संवाद साधला. सुरवातीस आयपीएस अधिकारी नयोमी साटम, प्राचार्य एन. बी. पवार यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी साटम म्हणाल्या की, मी अधिकारी व्हायचे हे निश्चित केल्यामुळे विज्ञान शाखेला प्रवेश न घेता, कला शाखेला प्रवेश घेतला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय माझ्या आवडीचे होते. मी अर्थशास्त्र विषयातून बीए ची पदवी संपादन केली.

पदवीचे शिक्षण घेत असतानाच, स्पर्धा परीक्षेची तयारी झाली महाविद्यालयातील विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. महाविद्यालयामध्ये असतानाच मी अधिकाऱ्यांची शिस्त व नीटनेटकेपणा अंगी बाळगली होती. पदवीनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मध्येच कोविडचे संकट आले तरीही अभ्यास सुरूच होता.

तुम्हीही कॉलेज जीवनापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय तुम्हीही यूपीएससी करू शकता. अनेक करिअरच्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. त्या पर्यायांचा शोध घेऊन मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष पदावरून बोलताना प्राचार्य एन. बी. पवार म्हणाले, महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित असायला पाहिजे.

कितीही संकटे आली तरी त्यांना न डगमगता, ध्येयापासून विचलित न होता काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी गुलामगिरीची मानसिकता बदलून, आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. साटम मॅडम यांचा आदर्श घेऊन तुम्ही अभ्यास करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय गायकवाड, स्पर्धा परीक्षा विभाग व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख, प्रा. डॉ. राजेश गावकरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. परमेश्वर होनराव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी तर आभार प्रा. डॉ. नवनाथ जगताप यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT