covid vaccine
covid vaccine covid vaccine
सोलापूर

100 टक्‍के लसीकरणाच्या गावातून कोरोना हद्दपार!

तात्या लांडगे

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास आठशेहून अधिक गावे कोरोनामुक्‍त झाली आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील 34 लाख 14 हजार 400 व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Vaccines) टोचणे अपेक्षित आहे. परंतु, 16 जानेवारीपासून आतापर्यंत शहरातील साडेतीन लाख तर ग्रामीणमधील पावणेअकरा लाख व्यक्‍ती दोन्ही डोस टोचून कोरोनापासून (Corona)सुरक्षित झाल्या आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे (Covishield) 38 लाख 60 हजार 450 डोस तर कोवॅक्‍सिनचे (Covacin) एक लाख 28 हजार 80 डोस आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी 18 वर्षांवरील सर्वांनीच लस टोचून घ्यायला हवी, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्‍त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे प्रयत्न सुरु आहेत. तरीही, जिल्ह्यातील 18 ते 44 या वयोगटातील तरुणांचे लसीकरण (Vaccination) खूपच कमी आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोना गेला, या गैरसमजुतीतून अनेकांनी लस टोचली नाही. काहीजण जाणिवपूर्वक लस टोचून घेत नसल्याचीही वस्तूस्थिती आहे.

पालक अधिकारी नियुक्‍तीनंतरही लसीकरणाचा वेग वाढलेला नाही. दोन्ही डोस टोचलेल्यांनाच पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel), किरणा दुकाने, मॉल्स्‌मध्ये प्रवेश देण्यासंदर्भातील निर्बंध घालण्यात आले. परंतु, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने लसीकरणाला गती येत नसल्याचे बोलले जात आहे. सध्या जिल्ह्यात एक लाख 15 हजार 290 डोस शिल्लक आहेत. दरम्यान, सुरवातीला जिल्ह्यातील काहीजणांनी परजिल्ह्यातून लस टोचून घेतली आहे, तर काहीजण नोकरी (Job), शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गेल्याने त्यांनी त्याठिकाणी लस टोचून घेतली आहे. तरीही, जिल्ह्यातील अजून जवळपास साडेचार लाख व्यक्‍ती लसीकरणापासून दूर असल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली.

100 टक्‍के लसीकरणाच्या गावातून कोरोना हद्दपार

जिल्ह्यातील जवळपास आठशेहून अधिक गावे कोरोनामुक्‍त झाली आहेत. बऱ्याच गावातील 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेतली आहे. विशेष बाब म्हणजे ज्या गावांत 100 टक्‍के लसीकरण झाले आहे, त्या गावातून कोरोना हद्दपार होऊ लागला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यूदेखील पूर्णपणे थांबल्याची स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर 18 वर्षांवरील सर्वांनीच लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय सुरक्षित व्यक्‍ती

तालुका              दोन्ही डोस टोचलेले

- उत्तर सोलापूर     31,220

- दक्षिण सोलापूर   96,759

- मोहोळ               67,914

- मंगळवेढा          52,883

- सांगोला              79,876

- माढा                  1,04,528

- अक्‍कलकोट      1,07,402

- करमाळा            86,205

- माळशिरस        1,38,829

- बार्शी                 1,53,189

- पंढरपूर             1,24,703

- सोलापूर शहर     3,59,910

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT