Lal Bawta
Lal Bawta 
सोलापूर

26 नोव्हेंबरचा देशव्यापी संप यशस्वी करा : माजी आमदार आडम मास्तर 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कामगार क्रांतीचा इतिहास कोणी पुसू शकणार नाही. कारण, त्यासाठी लाखो लोकांनी शहादत दिली आहे आणि ते त्यांच्या रक्ताने लिहिले गेले आहे. शोषणविरहित मानवी जीवनाचे स्वप्न कोणी साकार केले असेल तर ते केवळ कम्युनिस्ट विचारसरणीने. आणि ते सत्यात उतरवण्याचे काम पहिल्यांदा सोव्हिएत रशियाने, कॉ. लेनिन आणि त्यांच्यासोबतच्या लाखो कामगार, शेतकरी, महिला, युवक, विचारवंत आणि कष्टकरी जनतेने केले, असे प्रतिपादन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. 

आज (शनिवार, 7 नोव्हेंबर) सोव्हिएत रशियाच्या समाजसत्तावादी क्रांतीला 103 वर्षे पूर्ण झाली. तसेच भारतात राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या कामगार संघटनेचे शताब्दी वर्ष तर देशातील सर्वांत मोठी कामगार संघटना सिटूचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दत्तनगर मध्यवर्ती कार्यालय येथे सकाळी सोव्हिएत क्रांती दिन साजरा करण्यात आला. श्री. आडम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रत्येक शाखा व विभागात क्रांतिदिन साजरा करण्यात आला. 

या वेळी श्री. आडम म्हणाले, या क्रांतीने पहिल्यांदाच भांडवली शोषणकर्त्या वर्गाची सत्ता उलथवून कामगार, कष्टकरी वर्गाची सत्ता स्थापून सोव्हिएत रशियाने जगासमोर आदर्श निर्माण केला होता. त्यानंतर देशात सर्वांना शिक्षण, रोजगार निर्मिती यावर भर देत कामगार कष्टकरी वर्गाला, युवक, महिला यांच्या विकासास चालना देत राज्य चालवले. हिटलरने रशियावर युद्ध लादले होते, परंतु मजबूत कम्युनिस्ट विचारांच्या सरकारने त्याचा पाडाव केला. 

ते पुढे म्हणाले, भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर कामगार संघटनेची स्थापना झाली ती 31 ऑक्‍टोबर 1920 रोजी. शताब्दी वर्ष तर सेंटर ऑफ ट्रेड युनियन (सिटू) या देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असा त्रिवेणी संगम कामगार संघटनांनी मोठे लढे देत कामगारांच्या हिताचे कायदे करायला भाग पाडले. पेन्शन, बोनस, हक्करजा, कामाचा अधिकार, संघटित होण्याचा अधिकार कामगारांनी लढून मिळवले आहेत, ते आज मोदी सरकार उद्‌ध्वस्त करत आहे. शेतकरीविरोधी तीन प्रतिगामी कायदे करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले आहे. याविरोधात संघटितपणे लढा देण्याची गरज आहे. येत्या 26 नोव्हेंबरला कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात मोठ्या प्रमाणात संख्येने सामील होत हा संप यशस्वी करावा, असे आवाहन श्री. आडम यांनी केले. 

या वेळी सिटूचे महासचिव एम. एच. शेख यांनी सिटूच्या क्रांतिकारी लढ्याचा इतिहास मांडला. क्रांतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रजा नाट्य मंडळाच्या कलापथकाने क्रांतिकारी गीते सादर केली. व्यासपीठावर नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी, मुरलीधर सुंचू, युसूफ मेजर, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, हनीफ सातखेड, कुरमय्या म्हेत्रे, सलीम मुल्ला, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, अनिल वासम, प्रशांत म्याकल, अशोक बल्ला आदींसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT