MLA RanjitSinh Mohite Patil released from home quarantine
MLA RanjitSinh Mohite Patil released from home quarantine 
सोलापूर

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील होम क्वारंटाइनमधून मुक्त

सकाळ वृत्तसेवा

अकलूज (सोलापूर) : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली व ते दोघेही क्वारंटाइनमुक्त झाले. 
मुंबईहून आमदारकीची शपथ घेऊन अकलूजला परतल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःला मंगळवारी (ता. 19) होम क्वारंटाइन करून घेतले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, स्वीय सहायक बापू शितोळे, वाहनचालक किसन कदम व मधुकर घोगरे हेही शपथविधीच्या कार्यक्रमास मुंबई येथे गेले होते. या सर्वांनीही आपापली तपासणी करून तेही होम क्वारंटाइन झाले होते. आज, मंगळवारी (ता. 2) त्यांचा होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी सपत्नीक अकलूज उपजिल्हा रुग्णालयात येऊन तपासणी करून घेतली व क्वारंटाइनमुक्त झाले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया खडतरे, डॉ. संतोष खडतरे, डॉ. मोनिका मिसाळ (पवार) आदी उपस्थित होते. 

आमदार मोहिते-पाटील यांनी होम क्वारंटाइनच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत शेती, सहकार, व्यापार, आरोग्य सुविधा आदींसंदर्भात त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींशी ऑनलाइन चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत पत्राद्वारे विविध मागण्या केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT