Ramesh Baraskar
Ramesh Baraskar sakal
सोलापूर

Dahihandi Festival : मोहोळ शहरात प्रथमच दहीहंडी उत्सवात मुंबईच्या महिला पथकाला पाचारण

राजकुमार शहा

मोहोळ - मोहोळ शहर मध्यवर्ती व वन मॅन शो गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ येथे रविवार ता. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता, मोहोळ नगर परिषदेसमोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून, यासाठी मुंबई येथील महिलांच्या दहीहंडी पथकाला पाचारण केल्याची माहिती या सोहळ्याचे आयोजक तथा प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.

मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरा करण्याचे हे दुसरे वर्ष असून, यासाठी विजेत्या संघाला भरघोस रकमेच्या बक्षिसाचे आयोजन केले आहे. हा दहीहंडी उत्सव मोहोळ नगर परिषदेसमोर साजरा करण्यात येणार आहे.

शारीरिक तंदुरुस्ती व युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगत, पुणे मुंबई सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी सोहळ्याचे आयोजन होते, मग मोहोळ शहरात काय अडचण आहे. या पार्श्वभूमीवर या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केल्याचे बारसकर यांनी सांगितले.

मुंबई येथील महिलांचे दुर्गा माता महिला दहीहंडी पथक, शिवशंभो दहीहंडी पथक बारामती व महात्मा फुले दहीहंडी पथक इंदापूर या पथकांनी या उत्सवासाठी सहभाग नोंदविला आहे. एकूण सहा थर लावल्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण एलईडी, लेजर शो, शार्पी लाईट, पेपर ब्लास्ट आदी सह अत्याधुनिक लाईट डेकोरेशन असणार आहे.

गेल्या वर्षी प्रथमच दहीहंडीचे येथे आयोजन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगत यावर्षी गेल्या वर्षीपेक्षाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा बारसकर यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी या सोहळ्याच्या तयारीसाठी केवळ दोनच दिवसाचा अवधी मिळाला होता.

मात्र, चालू वर्षी तयारीसाठी ज्यादा कालावधी मिळाल्याने त्यांनी सांगितले. मोहोळ शहरातील सर्व तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे यांना आमंत्रित केल्याचेही बारसकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT