Mohol Crime
Mohol Crime Sakal
सोलापूर

Mohol Crime : मोटार सायकल चोराच्या टोळीचा पर्दाफाश, सोळा लाखाच्या मोटार सायकली जप्त

राजकुमार शहा

मोहोळ - औसा व लातूर परिसरात चोरलेल्या मोटरसायकली मोहोळ तालुक्यात विक्री करणारी टोळी मोहोळ पोलिसांनी पकडली असून, त्यांच्या कडून विविध कंपनीच्या 16 लाख 20 हजाराच्या 24 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोघा जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ, औसा, जि. लातूर येथील एक इसम चोरीच्या मोटरसायकली मोहोळ येथे आणुन विक्री करण्याकरिता देत असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्या माहिती नुसार संशयीता बाबत माहिती काढून संशयीतास ता. 13 एप्रिल रोजी ताब्यात घेऊन सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने, त्याचे नाव पवनराज गुलाब चव्हाण रा, तावशी, ता.औसा जि. लातूर असे सांगीतले.

त्याने औसा, लातूर, सोलापूर, मोहोळ, बीड, आंबेजोगाई, पुणे, पंढरपूर, इंदापूर, कर्नाटक या परिसरातील 24 मोटरसायकली चोरी करून त्या खुदबुददीन आमिन सय्यद रा. धानोरे, ता. माढा यांच्याकडे नंबर प्लेट बदलून फायनान्सची गाडी आहे असे सांगून विक्रीसाठी देत होता. त्यानंतर पोलिस पथक धानोरे येथे जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने पवनराज गुलाब चव्हाण हा त्याच्याकडे चोरीच्या मोटरसायकली विकण्यासाठी देत होता असे सांगितले. सदर संशयीता बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणा वरील गाड्या लाॅक तोडून चोरून आणत.

सदर गाड्या विक्री करीत असताना गाडीची कागदपत्रे फायनान्स ऑफिसला जमा आहेत. तुम्हाला परत देतो असे सांगून लोकांची दिशाभूल करून अत्यंत कमी किमतीत गाडीची विक्री करीत होता. सदर इसमाकडुन मोहोळ पोलिसांनी 16 लाख 20 हजाराच्या 24 मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अघिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, अमोल घोळवे, प्रवीण साठे,सिद्धनाथ मोरे, सायबर क्राईमचे धीरज काकडे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT