mp dr siddheshwar mahaswamiji caste verification
mp dr siddheshwar mahaswamiji caste verification Sakal
सोलापूर

Solapur News : खासदार महास्वामींचे जात प्रमाणपत्र प्रकरणी जात पडताळणी समितीची न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करून निर्णय द्यावा, असे उच्च न्यायालयाचे आदेश होते. त्यासाठी न्यायालयाने दिलेली सहा महिन्यांची मुदत ५ जानेवारीला संपली आहे.

तत्पूर्वी, सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तीन महिन्यांच्या मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी खासदार डॉ. महास्वामी यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याची तक्रार प्रमोद गायकवाड,

मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीकडे दाखल केली होती. समितीचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांनी या प्रकरणात दक्षता पथक नेमून दोन्ही बाजूंची सुनावणी घेतली.

दक्षता पथकाचा अहवाल व उपलब्ध कागदपत्रांनुसार खासदारांकडील जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता. त्यावेळी आपल्याला पुरेशी कागदपत्रे सादर करण्यास व म्हणणे मांडण्यास समितीकडून पुरेसा वेळ दिला नसल्याप्रकरणी खासदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची सहा महिन्यांत फेर चौकशी करून निर्णय घ्यावा व त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा असे आदेश दिले होते. त्यानुसार समितीचे विद्यमान अध्यक्ष बी. जी. पवार यांनी दक्षता पथक नेमले व या प्रकरणाची फेरचौकशी सुरू केली.

पण, खासदारांच्या वडिलांच्या १०८ वर्षांपूर्वीच्या जन्म-मृत्यू नोंदीची परराज्यातील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेतून तपासणी व्हावी, अशी मागणी खासदारांच्या वकिलांनी समितीकडे केली.

त्यास परवानगी देण्यात आली असून आता अक्कलकोट तहसीलदारांमार्फत प्रयोगशाळेतून त्या कागदपत्रांवरील नोंदीची पडताळणी होणार आहे. दुसरीकडे दक्षता पथकाचे दोन्ही सदस्य वैयक्तिक कारणास्तव रजेवर असून या पथकाचाही अहवाल समितीला मिळालेला नाही. तरीपण, आगामी तीन महिन्यांत समितीला या प्रकरणावर अंतिम निकाल द्यावा लागेल अशी सद्य:स्थिती आहे.

भाजपकडून लोकसभेचा उमेदवार कोण?

मागील लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणाची फेरचौकशी सुरू झाली आहे.

दरम्यान, समितीच्या मागणीनुसार उच्च न्यायालयातून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यास खासदारांच्या जात प्रमाणपत्रावरील अंतिम निर्णय मार्चअखेर होवू शकतो. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा डॉ. महास्वामी यांनाच की दुसऱ्या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT