ncp sharad pawar group vinaykumar elected for tehsil president
ncp sharad pawar group vinaykumar elected for tehsil president Sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (खा.शरद पवार गट) तालुका अध्यक्षपदी विनयकुमार पाटील यांची नियुक्ती

राजकुमार शहा

मोहोळ : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (खासदार शरद पवार गट) मोहोळ तालुका अध्यक्षपदी नरखेड ता मोहोळ येथील विनयकुमार श्रीरंग पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तशा आशियाचे लेखी पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पाटील यांना दिले.

या संदर्भात अधिक माहिती देताना नूतन अध्यक्ष पाटील म्हणाले, खा शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराचा मोहोळ तालुका आहे. यापूर्वीचे तालुका अध्यक्ष रमेश बारसकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. दरम्यान सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान या पूर्वीच्या कांही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. लवकरच नूतन तालुका कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे सांगत,

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. अध्यक्ष पाटील यांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अशा विविध पदावर काम केले आहे. त्याचा फायदा पक्षाला होणार आहे. यावेळी अॅड वैभव मोटे, जितेंद्र अष्टुळ, विक्रम दळवी,अभिजीत खंदारे,राजाभाऊ रसाळ, मंगेश पांढरे,प्रकाश धोत्रे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT