police officers transferred in solapur  esakal
सोलापूर

पोलिस आयुक्‍तांचे आदेश! शहरातील 18 पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

तात्या लांडगे

शहरातील चार पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांची, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सुरक्षा शाखा, अतिक्रमण विभाग, नियंत्रण कक्ष व शहर वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचीही बदल्या नवीन आदेशानुसार करण्यात आल्या आहेत.

सोलापूर : शहरातील चार पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांची अंतर्गत बदली करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी मंगळवारी (ता. 8) काढले. तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सुरक्षा शाखा, अतिक्रमण विभाग, नियंत्रण कक्ष, आरसीपी व शहर वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचीही बदल्या नवीन आदेशानुसार करण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्‍तांच्या नव्या आदेशानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्याकडे जेलरोड पोलिस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे. जेलरोड पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्याकडे जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचा कार्यभार दिला गेला आहे. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्याकडे फौजदार चावडी पोलिस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला. तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्याकडे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्याकडे सुरक्षा कक्ष, जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे अतिक्रमण विभाग, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्याकडे 'आरसीपी'ची जबाबदारी दिली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ सिद यांच्याकडे शहर वाहतूक शाखेची जबाबदारी तर फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांची जेलरोड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेकडील पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांची बदली एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली झाली. पोलिस निरीक्षक सय्यद यांच्याकडे सायबर सेलची जबाबदारी दिली आहे. तसेच पोलिस निरीक्षक संपत पवार यांच्याकडे उत्तर विभागातील वाहतूक शाखेचा कार्यभार सोपविला असून त्यांच्या जोडीला सहायक पोलिस निरीक्षक अंबादास सुनगार, नितीन पवार, श्रीकांत जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर पोलिस उपनिरीक्षक विकास घुगे यांची दक्षिण विभागातील वाहतूक शाखेकडे बदली केली आहे.

उदयसिंह पाटलांना मिळाला न्याय
वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी केल्याचे कौतूक तत्कालीन पोलिस आयुक्‍तांनी केले होते. परंतु, विजापूर रोडवरील एका ऑर्केस्ट्रा बारवर सहायक पोलिस आयुक्‍तांच्या पथकाने थेट कारवाई केल्यानंतर काही कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांच्याकडे भक्‍कमपणे बाजू मांडली आणि काही दिवसांत त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना काही महिने सायबर सेलचे काम पहावे लागले. त्यांच्याकडे आता फौजदार चावडी पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT