Gharkul Yojana
Gharkul Yojana  sakal
सोलापूर

Solapur : वंचित 1266 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : ग्रामीण भागातील बेघर, निवारा नसलेल्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत (Pradhanmantri Awas Yojana) ड नमुन्यात अर्जातील तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या 1266 लाभार्थ्यांना फेरसर्वेच्या माध्यमातून पुन्हा समावेश करण्याची संधी मिळणार आहे.

2011च्या सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षणाच्या आधारावर तालुक्‍यामध्ये घरकुलाचे लाभार्थी निश्‍चित करण्यात आले. त्यातून जवळपास 6500 घरकुल लाभार्थ्यांची अंतिम निवड निश्‍चित करण्यात आली. परंतु या सर्वेक्षणापासून अनेक कुटुंबे वंचित राहिल्याची ओरड झाल्यानंतर शासनाने या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना समावेश करण्यासाठी ड नमुन्यातील फॉर्म भरून घेण्यात आले. यामध्ये तालुक्‍यामधील 15 हजार 139 लाभार्थ्यांनी अर्ज दिले. या अर्जांची छाननी पंचायत समितीतील कर्मचारी व ग्रामपंचायतीचे डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात स्थळ पाहणी करून लाभार्थी निश्‍चित करण्यात आले असता त्यामध्ये 13 हजार 893 लाभार्थी पात्र तर 1266 लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले.

मागासवर्गीय लाभार्थ्याला रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून पर्याय आहे मात्र सर्वसाधारण लाभार्थ्यात्याला कोणताच पर्याय नसल्यामुळे त्यांच्यासाठी हा विषय चिंतेचा होता अपात्र ठरलेल्या अनेक लाभार्थ्यांनी आपल्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याबाबत आ.समाधान आवताडे व पंचायत समितीला कळविले अशा स्वरूपाच्या तक्रारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात झाल्यावर अशा लोकांना पुन्हा सर्वे करून पात्र ठरण्याबाबतचे आदेश देण्यात आल्यामुळे तालुक्यातील 1266 अपात्र लाभार्थ्यामधील फेरसर्वे होऊन पुन्हा या योजनेत नव्याने समावेश होऊ शकतो. मारापुर,देगाव,मुढवी या गावांमध्ये अपात्र लाभार्थी नसल्यामुळे त्या गावात नवीन लाभार्थ्यांना संधी नाही तर सलगर खुर्द येथे सर्वाधिक जास्त लाभार्थ्यांचा समावेश होऊ शकतो.

गावनिहाय लाभार्थी संख्या...

लक्ष्मी दहिवडी 8, हिवरगाव 25, अरळी 22, मानेवाडी 82, रेवेवाडी 19, धर्मगाव 7, मरवडे 18, येड्राव 31, जालिहाळ 46, गुंजेगाव 16, बावची 15, भोसे 13, हुलजती 62, निंबोणी 36, तांडोर 15, भाळवणी 38, जित्ती 10, उचेठाण 25, बोराळे 73, खोमनाळ 17, लमाणतांडा 13, नंदूर 7, संत चोखामेळा नगर 47, अकोला 13, आंधळगाव 43, आसबेवाडी 17, बठाण 4, ब्रह्मपुरी 7, चिक्कलगी 6, डोणज 13, डोंगरगाव 42, फटेवाडी 4, कचरेवाडी 27,खुपसंगी 6, लवंगी 36, लेंडवेचिंचाळे 46, माचणूर 49, महमदाबाद हु. 36, नंदेश्वर 21, येळगी,तळसंगी हुन्नूर,शेलेवाडी, पडोळकरवाडी प्रत्येकी 1,पाटकळ,भालेवाडी,मल्लेवाडी जंगलगी प्रत्येकी 2, रड्डे ,डिकसळ, गणेशवाडी, माळेवाडी,ममदाबाद शे.,लोणार, शिरनांदगी, हाजापूर प्रत्येकी 3,कागष्ठ,जुनोनी,खडकी, खवे,मारोळी प्रत्येकी 5,सोड्डी, तामदर्डी ,रहाटेवाडी,ढवळस,घरनिकी प्रत्येकी 9,संत दामाजी नगर, मुंढेवाडी,पौट,सलगर बु. प्रत्येकी 11,शिवनगी, कात्राळ,सिद्धापूर, गोणेवाडी,शिरसी प्रत्येकी 14,सलगर खुर्द 126,

माझ्या सभापतीपदाच्या कार्यकाळातच या योजनेच्या लाभासाठी तालुक्‍यामध्ये सर्वाधिक अर्ज स्वीकारले.अपात्र केलेल्या 1266 लाभार्थ्यांच्या फेरसर्वेची मागणी केली.शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे या वंचित लाभार्थ्यांना आता घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

- प्रदीप खांडेकर, माजी सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT