Read Movement of Dhangar Samaj
Read Movement of Dhangar Samaj 
सोलापूर

वाचा : धनगर समाज करणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : धनगर समाजाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आरक्षण द्यावे; अन्यथा येत्या 18 मार्चपासून उद्धव ठाकरेंच्या "मातोश्री'च्या दारात धनगर समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा मल्हार आर्मीचे नेते सुरेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. धनगर समाज प्रणीत मल्हार आर्मीच्या प्रतिनिधींची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. 

मागच्या सरकारने हा प्रश्‍न सोडवला नाही 
आघाडी सरकारच्या काळात धनगर समाजाच्या वतीने बारामती येथे आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आरक्षणाचा प्रश्‍न आम्ही सत्तेवर आल्यानंतर सोडवू असे आश्‍वासन दिले होते. तरीही भाजप-शिवसेना सरकारच्या काळात आरक्षणाचा प्रश्‍न सुटला नाही. त्यानंतर 24 डिसेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊन हा प्रश्‍न कायमचा निकालात काढू असे आश्‍वासन दिले होते. 

धनगर समाजाला न्याय मिळेल 
राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, अन्यथा येत्या 18 मार्चपासून त्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री. कांबळे यांनी दिला आहे. या वेळी बाळासाहेब बंडगर, काकासाहेब मारकड, माऊली हळणवर, सुभाष मस्के, विनायक मासाळ, विष्णू देशमुख, बिरुदेव शिंगाडे, गणेश गावडे, बिरुदेव देवकते आदींसह धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT