Vehicle
Vehicle 
सोलापूर

वाहन खरेदीवर नाही कोरोनाचा परिणाम ! परिवहनच्या महसुलात दोन कोटी रुपयांची वाढ 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचे संकट व लॉकडाउननंतर देखील वाहन खरेदीचे आकडे मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत परिवहन विभागाला नवीन वाहनांच्या खरेदीतून दोन कोटी रुपयांचा जादा महसूल मिळाला आहे. कोरोना सुरक्षिततेसाठी चारचाकी वाहन व नवीन व्यवसायासाठी दुचाकी व माल वाहनांचे खरेदीचे आकडे वाढले आहेत. 

दरवर्षी दसरा व दिवाळी खरेदीचा हंगाम वाहन खरेदीसाठी मोठ्या उलाढालीचा मानला जातो. या वर्षी कोरोना व लॉकडाउनमुळे वाहन खरेदी कमी होईल अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्षात वाहन खरेदीचा प्रतिसाद मागील वर्षीपेक्षा अधिक वाढला. कोरोना सुरक्षेसाठी प्रवासामध्ये स्वतःची चारचाकी गाडी असावी, हा ट्रेंड ग्राहकांमध्ये अधिक होता. त्यामुळे कारची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात झाली. अनेक विक्रेत्यांकडे कार बुकिंग अगदी मोठ्या प्रमाणात झाली. कुटुंबासाठी सुरक्षित प्रवास ही बाब या वर्षीच्या खरेदीसाठी महत्त्वाची ठरली. 

कोरोना संकटानंतर नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांची वाहन खरेदी देखील विशेष प्रमाणात झाली. त्यामुळे माल वाहनांचा खरेदीचा आकडा देखील अधिकच आहे. अचानक वाहन खरेदी वाढल्याने बाहेरून खरेदी झालेल्या वाहनांची नोंदणी देखील वाढली आहे. अजूनही वाहनांची बुकिंग झाल्यानंतर परिवहन खात्याकडे नोंदणीच्या प्रतीक्षा यादीतील वाहनांचे आकडे देखील लक्षणीय आहे. खरेदी झालेल्या वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. 

मागील दोन महिन्यांतील आकडेवारी 

  • मोटारसायकल व इतर दुचाकींची नोंदणी ः 4130 
  • मालवाहन नोंदणी ः 189 
  • कार नोंदणी ः 544 
  • ट्रॅक्‍टर नोंदणी ः 700 
  • परिवहन खात्याला मिळालेला महसूल ः 12 कोटी 21 लाख रुपये 
  • मागील वर्षीचा महसूल ः 10 कोटी 14 लाख 
  • नोंदणी प्रतीक्षा यादीतील कार ः 60 
  • नोंदणी प्रतीक्षा यादीतील इतर वाहने ः 12 
  • बाहेरून नोंदणीसाठी आलेल्या कार ः 131 
  • बाहेरून नोंदणीसाठी आलेल्या दुचाकी ः 197 

मागील वर्षीच्या तुलनेत महसुलाच्या रकमेचा आकडा मागील दोन महिन्यांत दोन कोटी रुपयांनी वाढला आहे. या वर्षी चारचाकी वाहनांची नोंदणी अधिक झाली आहे. 
- संजय डोळे, 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT