old Grinding on stone
old Grinding on stone sakal
सोलापूर

Sangola News : जातं व जात्यांवरील ओव्यांचा सूर आधुनिक काळात लुप्त होतोय

दत्तात्रय खंडागळे

सांगोला - आधुनिक काळात नवनवीन वस्तू, उपकरणे येवू लागल्याने जुन्या उपकरणे व वस्तू लुप्त होऊ लागल्या आहेत. पूर्वी पहाटेच्या रामप्रहरी ग्रामीण भागातील घराघरांतून ऐकू येणाऱ्या जात्यावरील ओव्यांचा सूर व जातं आता सध्याच्या आधुनिक युगामध्ये इतिहासजमा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पहाटे जात्यावरील ओव्याच्या सुमधूर आवाजांनी व देवतांच्या नामस्मरणांनी सर्वत्र वातावरण आल्हादायक होत होतं. दळण्यासाठी जातंच राहिलं नसल्याने ओव्यांचा तो सुर हरपल्याचे जाणवत आहे.

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात पहाटेची सुरुवात जात्याच्या घरघरीने व्हायची. घरातील कर्ती महिला दगडी जात्यावर दळण दळत दळत ओव्या गायची. जात्याचा आवाज हाच त्या गाण्यांसाठी पार्श्वसंगीत असायचा. त्या काळात महिलांना अभिव्यक्त होण्याचे जात्यावरील ओव्या हे एक प्रमुख माध्यम होते. माहेरची महती सांगणाऱ्या ओव्या, पती विषय असलेला आदर, निसर्गाची किमया, आपल्या शेती विषयी माहिती, देव देवतांचु नामस्मरण व त्यांच्या कथा महिला ओव्यातून भरभरून व्यक्त होत होती.

पह्यले गाऊ ओवी गं, रामराया सजनाला,

गाडीवर जाती, घुंगरु त्याच्या इंजनाला.

भोळा रे शंकर, भोळं तुझं घेण देण,

तुझ्या बेलामधे मला सापडल सोनं.

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ,

मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ.

अशा विविध ओव्या महिला गात असलेल्या पाहावयास मिळत होत्या. काळाचे चक्र जसे फिरले तसे जात्याचे चक्र नामशेष होताना दिसत आहे. विज्ञानाने मोठी प्रगती साधल्यामुळे आज खेड्यापाड्यांतही पिठाची गिरणी आली आहे. यामुळे आधुनिक काळात दगडी जाते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यावरील ओव्या इतिहासजमा होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक काळ असा होता, की दगडी जाते हे सासुरवाशिणीला अभिव्यक्त होण्यासाठीचे हक्काचे माध्यम होते.

विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याने जुनी साधणे अडगळीत पडल्याचे, कालबाह्य झाल्याचे जाणवत आहे. दगडी जाते हाही यातीलच एक भाग आहे. लग्नकार्यात, समारंभाप्रसंगी जात्यावरील हळद दळणे व त्या वेळी गाणे म्हणण्याची पद्धत प्रचलित होती.

एखादा सण-उत्सव असल्यास घरामध्ये त्या त्या प्रकारचे गोडधोड करण्यासाठी तांदूळ, मूग, तुरडाळ आदी धान्येही जात्यावर दळली जात होती. आता घरोघरी घरघंटी उपलब्ध झाल्या आहेत. पिठांच्या गिरण्यांमध्येही स्पर्धा वाढू लागली आहे, परंतु या सर्व गोष्टीत पारंपरिक दगडी जाते मात्र काळानुरूप इतिहासजमा झाले आहे.

पूर्वी जात्यावरच्या ओव्या महिलांना व्यक्त होण्याचे होते साधन -

आजच्या काळामध्ये महिलांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्यक्त होण्यासाठी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियाची माध्यमे मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु पूर्वीच्या काळी महिलांना व्यक्त होण्यासाठी कोणतेही माध्यम नव्हती.

त्याकाळी महिला आपल्या मनातील भावभावना, आपल्या माहेरची परिस्थिती, देव देवतांची महती सांगणारे ओव्या, आपल्या कुटुंबाविषयी माहिती सांगण्यासाठी ती जात्यावरच्या ओव्यांमधून व्यक्त होत होती. आपले सुख-दुःख ती जात्यावर दळताना ओव्यांच्या माध्यमातून बाहेर काढायची. धान्य दळताना ती एकप्रकारे जणु स्वतःच्या मनाचेही दळण दळत होती.

ठळक बाबी -

- पूर्वी महिलांच्या मनातील भावना ओव्यांमधून व्यक्त होत होत्या

- पहाटे ओव्यांमधील देवदेवतांच्या नामस्मरणामुळे संपूर्ण घरात अल्हाददायक वातावरण निर्माण होत असे

- जातं सतत ओढल्यामुळे महिलांच्या शरीराचा व्यायामही आपोआप होत होता

- जात्यावरच्या ओव्यांमधून महिलांचे सुख-दुःख आपोआप समजून येत होते

- जात्याचा व ओव्यांच्या गाण्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही पहाटेच जाग येत होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT