Crime
Crime Sakal
सोलापूर

Sangola Crime : चोरीस गेलेल्या 10 मोटरसायकली व 5 मोबाईल शोधण्यास पोलिसांना यश

दत्तात्रय खंडागळे

सांगोला पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास पकडून त्यांच्याकडून 10 मोटरसायकल व गहाळ झालेले 5 मोबाईल असा एकूण 3 लाख 58 हजार 500 रुपयेंचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.

सांगोला - सांगोला पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास पकडून त्यांच्याकडून 10 मोटरसायकल व गहाळ झालेले 5 मोबाईल असा एकूण 3 लाख 58 हजार 500 रुपयेंचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

तालुक्यातील मोटरसायकलच्या वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेऊन यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. दिनांक 20 एप्रिल रोजी संगेवाडीतील मेथवडे फाटा (ता. सांगोला) येथे एक व्यक्ती मोटरसायकल कमी किमतीत व कागदपत्रे नसलेली विक्री करीत असल्याची बातमी गोपनीय मार्फत पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधून त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव सागर दुर्योधन धांडोरे (रा. अजनाळे, ता. सांगोला) असल्याचे उघड झाले. या व्यक्तीने कोल्हापूर, पंढरपूर, मंगळवेढा इथून मोटरसायकलची चोरी करून संगेवाडी (मेथवडे फाटा) येथे काम करीत असलेल्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी सदर ठिकाणाहून 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या.

मोटरसायकल चोरीबरोबरच पोलिसांनी सांगोला आठवडा बाजार येथून चोरीस गेलेले 4 व्हिओ कंपनीचे व एक ओपो कंपनीचा पाच मोबाईल शोधण्यास यश आले आहे. 68 हजार 500 रुपयांचा पाच मोबाईल पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून हस्तगत केले आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, अभिजीत मोहोळकर, बाबासाहेब पाटील, सुजित जाधव, लक्ष्मण वाघमोडे व सायबर पोलीस स्टेशनकडील युसुफ पठाण यांनी मदत करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT